शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? बावनकुळेंनी सांगूनच टाकलं

शिर्डी लोकसभेची जागा कोण लढवणार? बावनकुळेंनी सांगूनच टाकलं

Chandrashekhar Bawankule : आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहे. यासाठी आता राजकीय पक्षांकडून चाचपणी सुरु झाली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) आज शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. यावेळी शिर्डी लोकसभा(Shirdi Loksabha) जागेबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. शिंदे गटाने उमेदवार दिला अथवा अजित पवार यांनी दिला तर तर आम्ही त्यांचा प्रचार करू कारण आम्ही महायुती म्हणून काम करतो आहे. तसेच याबाबत केंद्रीय नेतृत्व तसेच राज्याचे नेतृत्व हे एकत्रित येऊन याबाबतचा निर्णय घेणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

NCP Crisis : राष्ट्रवादी आमचीच! ‘त्या’ नोटिसीला अजित पवार गटाचं 260 पानांचं उत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा प्रवासात आज दि. 28 नोव्हेंबर रोजी ते नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा क्षेत्राचा दौरा करत आहे. या प्रवासात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहे. दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या गटातील सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहे. तर याच मतदार संघात आता भाजपचे संपर्क अभियान सुरु आहे.

Sharad Pawar : … तर राष्ट्रवादी लोणच्या एवढी तरी राहिलं का? ‘त्या’ सभेवरून शेलारांचा शरद पवारांना टोला

दरम्यान शिर्डी लोकसभा सध्या एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे सध्या विद्यमान खासदार आहे. तर येथील जागेसाठी ठाकरे गटाकडून देखील हालचाली सुरु आहे. दरम्यान भाजपचे राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभेचा प्रवास सुरु झाला आहे. यातच बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर आल्याने भाजप शिर्डी लोकसभेची तयारी करत आहे की काय ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

‘सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकले पण..,’; CM शिंदेंनी ठाकरे गटाला पुन्हा डिवचलं

शिर्डी लोकसभेवर बोलताना बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी उमेदवार दिला अथवा अजित दादांचा उमेदवार असले तर त्यांच्या समर्थनार्थ आम्ही असणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजप देखील महायुतीचा भाग म्हणून कार्यरत असणार आहे असे ते म्हणाले. तसेच याबाबत केंद्रीय नेतृत्व तसेच राज्याचे नेतृत्व हे एकत्रित येऊन याबाबतचा निर्णय घेतला जाईल. उमेदवार कोणी असो जागा कोणालाही मिळो मात्र, 51 टक्के मत मिळवून देण्याचे काम हे भाजपचे आहे ते आम्ही करणार असेही यावेळी बावनकुळे म्हणाले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु असतानाच महायुतीचा घटक पक्ष आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शिर्डीच्या जागेवरुन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं होतं. तर ठाकरे गटाकडून पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे यांची रस्सीखेच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोण उमेदवारय़ शिर्डीतून कोण बाजी मारणार? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube