Pune News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबीयांची भेट; गौरव बापट म्हणाले…

Rajnath Singh: भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट (girish bapat) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh ) पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर आवर्जून गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन बापट […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 15T141055.009

Rajnath Singh

Rajnath Singh: भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट (girish bapat) यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. यानंतर देश आणि राज्यभरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी पुण्यात आल्यानंतर आवर्जून बापट कुटुंबीयांची भेट घेतली.

दरम्यान, आज देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh ) पुणे दौऱ्यावर होते. त्यांनी आपल्या दौऱ्याचा नियोजित कार्यक्रम उरकल्यानंतर आवर्जून गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन बापट कुटुंबीयांची अस्थेवायिकपणे विचारपूस केली. यावेळी संपूर्ण बापट कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांची विचारपूस करत गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. बापट यांचे संसदेतील कार्य, त्यांचा स्वभाव अशा अनेक गोष्टीवर राजनाथ सिंह मनमोकळेपणाने बोलले.

या भेटीनंतर गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट म्हणाले, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कुटुंबीयांची भेट घेतली. 2019 साली बापट साहेब खासदार होण्याआधी पासून राजनाथ सिंह आणि गिरीश बापट यांची मैत्री होती. 2003 सालापासून राजनाथ सिंह आणि आमचे कौटुंबिक जव्हाळ्याचे संबंध होते. राजनाथजी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी बापट साहेबांकडे अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्या सर्व आठवणींना आज राजनाथ सिंह यांनी उजाळा दिला, अशी माहिती गौरव बापट यांनी दिली.

Akola Riots : काही लोक आगीत तेल ओततात, सगळं बाहेर आणणार; अकोला दंगलीवरून फडणवीसांचा निशाणा

दरम्यान, गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे. पोटनिवडणूक जर झाली तर या जागी बापट कुटुंबातील सदस्याला येथून उमेदवारी दिली जाऊ शकते,अशी चर्चाही सुरू आहे. यादरम्यान भाजपच्या राज्यातील आणि देशातील बडया नेते बापट कुटुंबीयांची भेट घेत असल्याने बापट कुटुंबीयांची दावेदारी पुणे लोकसभेसाठी पक्की मानली जात आहे.

Exit mobile version