आम्ही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी… जैन बोर्डिंग प्रकरणी राजू शेट्टी यांनीही दिला मोहोळांना इशारा

Raju Shetty यांनी देखील मोहोळांना इशारा दिला आहे की, गोखले बिल्डर्सनी टोकाची भूमिका घेण्याच्या आधी आपली भूमिका त्यांना सांगावी.

Raju Shetty

Raju Shetty

Raju Shetty Warn to Muralidhar Mohol for Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. (Pune) पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. मोहोळ यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. यामध्ये आता जैन मुनींनंतर राजू शेट्टी यांनी देखील मोहोळांना इशारा दिला आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी?

रविवारी दुपारी माझ्या अध्यक्षतेखाली जैन बोर्डिंग या ठिकाणी 86 हुन अधिक जैन संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन एकमताने ठराव करण्यात आला की, HND जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय जो ट्रस्टींनी घेतलेला आहे तो बेकायदेशीर आहे. विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात साठ वर्षाहून अधिक असणारे बोर्डिंग विकणे हे बेकायदेशीर आहे. अत्यंत लाजिरवाणी ही गोष्ट आहे. त्यामुळे हा व्यवहार रद्द करण्याची विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी ज्यांनी खरेदी केली आहे. त्या गोखले बिल्डर्सला देखील विनंती करण्याचा ठराव झाला.

काहींना व्यापारामध्ये लाभ तर काहींच्या करिअरमध्ये चढ-उतार, कसा आहे आजचा दिवस?

एक तारखेपासून जे आंदोलन सुरू होणार होतं त्यापूर्वी या सर्वांशी संवाद साधावा. असं मला सगळ्यांनी सांगितलं. टोकाची भूमिका घेण्याच्या आधी आपली भूमिका त्यांना सांगावी. एक तारखेला गुप्तिनंदी महाराजांनी उपोषण सुरू केल्यानंतर संपूर्ण देशभरात आंदोलन केल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही. याची जाणीव केंद्र आणि राज्य सरकारला करून द्यावी असा निर्णय या बैठकीमध्ये झाला. पत्रकार परिषद संपून कोल्हापूरला जाण्यापूर्वी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माझ्याशी संपर्क साधला.

भिनेत्री प्रार्थना बेहेरेवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं रस्त्ये अपघातात निधन

संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आणि जैन धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही गोखले बिल्डर्सला विनंती केलेली आहे की हा व्यवहार त्यांनी रद्द करावा गोखले बिल्डर्सनी आमच्या विनंतीला मान देऊन एच एन डी ट्रस्टीना मेल करून हा व्यवहार रद्द करण्याची विनंती केली आहे. हा व्यवहार रद्द करावा आणि जे 230 कोटी रुपये आम्ही ट्रस्टींना दिलेले आहेत अशी मागणी त्यांनी केली आहे जो मेल केला त्याची प्रत माझ्याकडे आलेली आहे.

डॉक्टर महिलेने आत्महत्या केली हे कुणीच मानायला तयार नाही; धनंजय मुंडे यांना ‘वेगळाच’ संशय

जरी गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला असला तरी आत्ता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरच नाव चढलेल आहे. ते नाव कमी होऊन पुन्हा एचएनडी बोर्डिंगच नाव लागत नाही आणि ही बोर्डिंग पुन्हा पूर्ववत होत नाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे.

मी मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की, केवळ पत्रामध्ये दिलं म्हणून आमचा लढा संपणार नाही, हा व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे. सरकारने पुढाकार घ्यावा. धर्मदाय आयुक्तांनी 28 तारखेला सुनावणी घेतलेली आहे. त्या सुनावणी दरम्यान आम्ही हे पत्र सादर करूच परंतु ते काहीही असलं तरी हा व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे.

महिला डॉक्टरच्या तळहातावरील लिखाणात…, माजी आमदार भीमराव धोंडे यांचा खळबळजनक दावा

जैन बोर्डींग हे पूर्णतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मालकीच आहे. त्यांचा तो हक्क आहे अधिकार आहे तिथे असणाऱ्या मंदिरामध्ये पुण्याचे भाविक गेल्या 60 ते 65 वर्षांपासून येतात तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे या ठिकाणची एक इंच जमीन सुद्धा आम्ही कोणाला देणार नाही हा आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे साडेतीन एकरच्या प्रॉपर्टीवरील गोखले बिल्डर यांचं नाव कमी होऊन hnd ट्रस्टीनच नाव लागत नाही. तोपर्यंत आमचा लढा थांबणार नाही.

Exit mobile version