Download App

माढ्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? मोहिते पाटलांनी रात्री उशीरा घेतली RSS च्या बड्या नेत्याची भेट

रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी काल (गुरुवारी) रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बड्या नेत्याची भेट घेतली

अकलूज : लोकसभा निवडणुकीत माढ्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणारे मोहिते पाटील घराणे पुन्हा चर्चेत आले आहे. आमदारकीमुळे तांत्रिकदृष्ट्या भाजपमध्ये अडकलेले रणजीतसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांनी काल (गुरुवारी) रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मोतीबागेतील संघाच्या कार्यालयात ही भेट पार पडली. यावेळी एका प्रत्यक्षदर्शीने मोहिते पाटील यांना संघाच्या कार्यालयातही जाताना बघितले. सुत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार मोहिते पाटील यांच्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी मध्यस्थी करावी या उद्देशाने ही भेट घेतली होती. (Ranjitsinh Mohite Patil met senior leader of Rashtriya Swayamsevak Sangh)

भुजबळांच्या आनंदावर संशोधन करा अन् त्यांना काय हवयं ते एकदाचं देऊन टाका; शिससाटांनी कान टोचले

रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या बंधू धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु भाजपने त्यांच्या ऐवजी रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड करत माजी उपमुख्यमंत्री आणि काका विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. माढ्यातून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला आणि निवडूनही आले.

ज्या पोपटांना मोठं केलं, त्यांनी विश्वासघात केला, त्यांचा सत्यानाश होणार; फडणवीसांचा हल्लाबोल

त्याचवेळी रणजितसिंह मोहिते पाटील विधान परिषदेचे आमदार असून अद्यापही भाजपमध्येच आहेत. ते संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीत पडद्यामागेच राहिले. त्यांनी ना भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला ना बंघू धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार केला. आता निवडणूक संपली आहे. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संघाच्या बड्या नेत्याची भेट घेतल्याने यामागील कारणांचा अंदाज लावला जात आहे. मोहिते पाटील यांच्या कारखाने आणि पतसंस्थांवर काही दिवसांपासून कारवाईची टांगती तलवार आहे. याशिवाय डीसीसी बँकेची केस अजुनही कोर्टात सुरु आहे. या सगळ्यामुळेच मोहित पाटील घराणे कारवाई्च्या विळख्यात सापडू शकते. बहुधा याचीच धास्ती रणजितसिंह यांनी घेतली असावी असे बोलले जाते. यातूनच संघाच्या नेत्याची भेट घेतली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

follow us