Download App

विद्यार्थ्यांनी नशेपासून दूर राहावे; रसिकलाल धारीवाल यांच्या जयंतीदिनी मकरंद अनासपुरेंचे आवाहन

  • Written By: Last Updated:

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रसिकलाल माणिकचंद धारीवाल (Rasiklal Dhariwal) यांच्या जयंतीनिमित्त (दि.1 मार्च) शिष्यवृत्ती वितरण आणि रक्तदान शिबीर संपन्ना झाला. यावेळी सैराट फेम अभिनेता आकाश ठोसरनं हजेरी लावत रक्तादात्यांचा उत्साह वाढवला. तर, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात नशेच्या आहारी जाऊ नये, तसेच आपण निवडलेल्या अभ्यासक्रमातून देशसेवा करावी, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. यावेळी बालन उद्योग समूहाचे अध्यक्ष पुनीत बालन (Punit Balan) हे देखील उपस्थित होते.

पुनित बालन ग्रुप ‘फ्रेंडशिप करंडक’ : साई पॉवर हिटर्स संघाने सलग दुसऱ्या वर्षी पटकावली ट्रॉफी

गेल्या 18 वर्षांपासून आर.एम.डी. फाऊंडेशनच्यावतीने 12 हजाराहून अधिक गुणवंत विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे, अशी माहिती फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी दिली. रसिकलाल धारीवाल यांना त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षण पूर्ण करता आले नव्हेत. मात्र, त्यांनी हार न मानता स्वकर्तुत्वाने आणि कष्टाने उद्योगविश्वात शिखर गाठल्याचे शोभा धारीवाल यांनी सांगितले.

‘पुनीत बालन ग्रुप’कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

रसिकलाल धारीवाल यांनी ज्या पद्धतीने उद्योगविश्वात अजरामर झाले त्याच पद्धतीने त्यांनी गरजू विद्यार्थांना उच्च शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो विद्यार्थांना मदत केली आहे. आपल्या वडिलांची सामाजिक कार्यपरंपरा सतत कार्यरत राहण्यासाठी नेहमी प्रेरित व प्रवृत्त करतात अशा भावना व्यक्त करत त्यांच्याच आशीर्वादाने आज भारतभर अनेक सामाजिक उपक्रम सर्वसामान्य लोकांसाठी राबविण्यात येतात असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन यांनी व्यक्त केल्या.

पुनीत बालन यांच्या कार्याची लष्कराने घेतली दखल, मध्य कमांडने प्रशस्तीपत्रक देऊन गौरवले

रक्तदान करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपा अधिकारी, उद्योग जगतातील मान्यवर, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेकजण रक्तदानास स्वइच्छेने सहभागी झाले होते. यावेळी 425 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

follow us