Download App

गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

Rationing Scam : रेशनिंग दुकानदारांकडून (Rationing shopkeepers)बेकायदेशीररित्या धान्य विकत घेत ते बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघालेल्या तिघांना पुणे पोलिसांनी (Police)अटक केली आहे.

भवानी पेठेतील कासेवाडी येथे मंगळवारी (दि. 11 एप्रिल) ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी (Police) 2700 किलो तांदळाच्या 54 गोण्या जप्त (54 sacks of rice seized)केल्या असून खडक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

‘वडिलांनी नाकारलं होतं सलमानचं स्थळ’, जुही चावलाने मांडलं ग्लॅमरमागचं वास्तव

जावेद लालू शेख (वय-35), अब्बास अब्दुल सरकावस (वय-34) आणि इम्रान अब्दुल शेख (वय-30) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे असून पोलीस शिपाई महेश जाधव यांनी याप्रकरणी तक्रार केली होती.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, कासेवाडी परिसरात रेशनिंग दुकानातील अन्नधान्याचा काळाबाजार (black market)सुरू असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी कासेवाडीतील राजीव गांधी सोसायटीच्या समोर रस्त्यावर उभा असलेला अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला. त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील सुमारे 2700 किलो तांदूळ घेऊन ते बाजारात विक्रीसाठी निघाले होते.

दरम्यान, पोलिसांनी टेम्पो आणि तांदूळ, असा एकूण 3 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.

Tags

follow us