पुण्यात महायुतीत राडा, रवींद्र धंगेकर घेणार मोठा निर्णय? लवकरच होणार घोषणा

Ravindra Dhangekar On Shivsena BJP Alliance :  पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये

Ravindra Dhangekar On Shivsena BJP Alliance

Ravindra Dhangekar On Shivsena BJP Alliance

Ravindra Dhangekar On Shivsena BJP Alliance :  पुणे महापालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार असून या युतीसाठी सध्या स्थानिक पातळीवर चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे जागा वाटापामुळे शिवसेनेमधील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज असून पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर आता माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी देखील माध्यमांशी बोलताना युतीबाबत प्रतिक्रिया देत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारी असल्याचे संकेत दिल्याने पुण्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात (Pune Politics) जागावाटपावरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला असल्याने माजी आमदार रवींद्र धंनेगर लवकरच मोठा निर्णय घेत मुलगा प्रणव धंगेकर यांना अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासाठी रवींद्र धंगेकर यांनी तयारी देखील सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रणव धंगेकर अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पक्षात आपल्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मान राखला जावा ( Shivsena BJP Alliance) अशी देखील मागणी रवींद्र धंनेगर यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले की, काल आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनांचा उद्रेक झाला. त्यांच्या भावनांचा विचार करुन पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे फक्त आमच्याच पक्षाने नाही तर प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांला मान सन्मान मिळाला पाहिजे या हेतूने काल आमचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटले आणि त्यानंतर उदय सामंत (Uday Samant) यांना भेटलो असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

तसेच जर पुणे शहरामध्ये कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे. भाजपने जो प्रस्ताव आमच्या शिवसेनेला दिला आहे तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही, त्यांनी जागा आम्हाला ऑफर केल्या आहेत, त्या जागेवर कधी भाजपही निवडून आलं नाही किंवा शिवसेनाही निवडून आलेली नाही. त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे असं देखील माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर म्हणाले.

तर पुढे बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आमच्या पक्षाचे उमेदवार देखील आम्हीच ठरवणार पण त्याउलट आमचे उमेदवार पण तेच ठरवणार, जागा देखील तेच ठरवणार असेल तर कार्यकर्त्यांचे भावना खूप तीव्र आहेत. आम्ही काल एकनाथ शिंदे यांना भेटून अशा प्रकारची युती करणे घातक आहे असं सागितलं आहे. जर तुमच्या जागा निवडणून येणार नसतील तर तुम्हाला युतीचा फायदा काय आहे, त्यापेक्षा आपण आपला निर्णय कार्यकर्त्यांच्या बाजून घेतला पाहिजे असं रवींद्र धंनेगर म्हणाले.

Exit mobile version