Download App

Ravindra Dhangekar : मला जेलमध्ये टाका, गोळी मारा, पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका

  • Written By: Last Updated:

“काल माझ्या कार्यकर्त्यांना पोलीस चौकीत नेवून ज्या पद्धतीने दमदाटी केली आहे, तत्याच्या घरात भीतीचे वातावरण तयार झालं आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते मुलाप्रमाणे सांभाळले आहेत. एकवेळ आम्हाला जेलमध्ये नेवून टाका, आम्हाला चौकात आणून गोळी मारा पण आमच्या कार्यकर्त्यांना हात लावू नका.” आमचे कार्यकर्ते आमच्या मुलाप्रमाणे आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना त्रास म्हणजे आम्हाला त्रास आहे. ज्या पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणी कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षानं पोलिसांना सोबत घेऊन पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यामुळे ते आज उपोषणाला बसले आहे. कसबा मतदार संघातील कसब गणपती मंदिरासमोर हे उपोषण सुरु आहे. उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या उपोषणाला अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

काल पाच वाजता प्रचाराची वेळी संपली तरीही संध्याकाळी सात वाजेपर्यत मुख्यमंत्री पोलिसांच्या देखत फिरत होते, पालकमंत्री, प्रवीण दरेकर देखील प्रचाराची वेळ संपल्यानंतर फिरत होते, त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा : Aurangabad : फतेहनगर, औरंगाबाद ते छत्रपती संभाजीनगर, नामांतराचा इतिहास, मागणी किती जुनी आहे?

पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत

पोलिसांच्या उपस्थितीमध्ये भाजप पैसे वाटत आहे. पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस स्टेशन भाजपचे कार्यालये झाली आहेत. त्यामुळे पोलिसांकडून न्याय मिळत नाही, त्यामुळे संविधानिक मार्गाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसल्याच त्यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण करणार असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं.

 

Tags

follow us