Download App

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींना रिटर्न टिकीट! पुण्यात किती पाकिस्तानी? जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितला आकडा

Pakistan च्या नागरिकांना लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.

Return tickets for Pakistanis after Pahalgam attack Pakistani Pune District Magistrates tells Figure : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Attack) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देखील कारवाईला सुरुवात केली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सरकारने पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारतामधील पाकिस्तानी नागरिकांनी लवकरात लवकर भारत सोडण्याचे आदेश भारत सरकारने (Indian Government ) नागरिकांना दिले आहे. त्यामुळे पुण्यामध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी आपलं सामान बांधायला सुरूवात केली आहे. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुण्यात किती पाकिस्तानी याचा आकडाच सांगितला आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधींना दिलासा, न्यायालयाकडून नोटीस बजावण्यास नकार

बुधवारी रात्री पीएम मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सरकारने परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय जाहीर केले, ज्यात सिंधू पाणी करार निलंबित करणे, वाघा-अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क अंतर्गत व्हिसा सूट रद्द करणे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने व्हिसा सूट रद्द केल्याने आता भारतात असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपूर्वी भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे.

राहुल गांधींना हवे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘हिंदुत्व पुस्तक’, न्यायालयात अर्ज

तर दुसरीकडे सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतण्याचा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. याच बरोबर भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. यामध्ये पुण्यामध्ये अधिकृत आकडा असलेले 111 पाकिस्तानी नागरिक आहेत. त्यापैकी 3 जण मायदेशी परतले आहेत. 91 जण दिर्घमुदतीच्या म्हणजे 5 वर्षांसाठी आले आहेत. त्यात 56 महिला आणि 35 पुरूष आहेत. यातील काही जण उपचार घेण्यासाठी तर काही जण नातेवाईकांना भेटण्यासाठी येत असतात. मात्र ही आकडेवारी वाढू शकते. यासाठी व्हिसा देणाऱ्या विभागाकडून माहिती मागवण्यात येत आहे.

ब्रेकिंग : वक्फ कायद्यावरील दुरूस्ती योग्यच; केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र

तर भारतीय सरकारने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याची घोषणा केली. पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले सर्व विद्यमान भारतीय व्हिसा 27 एप्रिल 2025 पासून रद्द करण्यात आले आहेत. पूर्वी जारी केलेले वैद्यकीय व्हिसा फक्त 29 एप्रिल 2025 पर्यंत वैध राहतील. नवीन नियमांनुसार, सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांचे व्हिसा संपण्यापूर्वी देश सोडण्यास सांगण्यात आले आहे.

follow us