पुणेः खाते उतारा, फेरफार मिळविण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक तलाठी भेटत असल्याने वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यावर उपाय म्हणून शासनाने सात-बारा, खाते उतारा, फेरफार हे ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे कागदपत्रे सेतू, महा ई सेवा (Maha E Seva) केंद्रातून मिळतात. परंतु हे कागदपत्रे मिळविण्यासाठी दर निश्चित करण्यात आले नव्हते. त्यामुळे नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत होती. परंतु आता त्यासाठी सरकारने शुल्क निश्चित केले आहे.
Pune : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा ‘या’ शहरांमध्ये होणार संपन्न
ई हक्क प्रणालीद्वारे एक फेरफार अर्ज नोंदविण्यासाठी आणि अपलोड करावयाच्या कागदपत्रासाठी नागरिकांकडून पंचवीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे. दोन प्रतीपेक्षा जास्त प्रती घ्यायच्या असतील, तर एका प्रतीसाठी दोन रुपये जादा आकारले जातील, असे शासन निर्णयात म्हटले आहे. या शासना निर्णयामुळे आता सेतू, महा-ई-सेवा केंद्र चालकांना जास्त पैसे आकारता येणार नाहीत. ही ॲानलाईन सुविधा संकेतस्थळ
महाभूमी पोर्टल
mahabhumi.gov.in, emahiti.in वर उपलब्ध आहे. ई करार, बोजा दाखल करणे, गहाणखत, वारस नोंद, मयताचे नाव कमी करणे, अ. पा.क. शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वतांचे बदल करणे इत्यादी फेरफार प्रकाराची नोंदी केल्या जाणार आहे.
Rupali Chakankar यांच्याबाबात अश्लील पोस्ट; पुणे पोलिसांनी उचलल मोठं पाऊल
ई हक्क प्रणालीद्वारे खातेदारांना फेरफार ऑनलाइन मिळतात. खातेदाराने हे कागदपत्रे ऑनलाइन काढल्यास ते मोफत मिळतात. परंतु प्रत्येक व्यक्तीकडे कॅम्प्ट्युर आणि इंटरनेट नसते. त्यामुळे हे सेतू केंद्र व महा ई सेवा केंद्र चालकांकडे गेल्यानंतर ते जास्त पैसे घेऊन पिळवून करत होते. त्यावर शासनाचे आता चाप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख सामन्य जनतेला उपलब्ध करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा सेवा केंद्र यांनी आकारण्याच्या शुल्कात एक वाक्यता राहावी व आर्थिक पिळवून होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.