Download App

Road Accident : कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात तिघे ठार, 5 जण जखमी

Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आताही असाच एक भीषण अपघात (Road Accident) पुणे-नाशिक महामार्गावर घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मंचरजवळ भल्या पहाटे हा अपघात झाला. नाशिकवरून भोसरीच्या दिशेने जात असताना जीप आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. राज्यात सगळीकडे पाऊस होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दाट धुके असते. या धुक्यात समोरचे काही दिसत नाही. अशा वेळी वाहनांचा अंदाज येणे कठीण असते. दाट धुके असल्याने समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की जीपच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Beed Accident : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमी होते त्यांना उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. जखमींमधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Road Accident : कर्नाटकात तीन भीषण अपघात! दोन ठार तर 9 जण जखमी

रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

 

Tags

follow us

वेब स्टोरीज