Download App

रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

Rohit Pawar On Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ईडी चौकशी प्रकरणात चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात (Pune Court)आमदार रोहित पवार यांनी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.

Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा रेड कार्पेट लुक अस्तित्त्वातच नव्हता’

सविस्तर माहिती अशी की, आमदार रोहित पवार यांना दुसऱ्यांदा ईडी कार्यालयाकडून चौकशीसाठी बोलवल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहित पवारांना डिवचलं होतं. गल्ला जर खाल्ला आहे, डल्ला जर मारला आहे, तर निश्चितच चौकशीला सामोरे जावे लागेल. आणि दूध का दूध पाणी का पाणी हे सिद्ध करावे लागेल असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.

मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…

रोहित पवार यांच्या ईडी चौकशीनंतर आपल्यावर कोणी खोटे आणि कोणी चुकीचे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी आता न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. आमदार रोहित पवार यांनी पुणे न्यायालयात जाऊन मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे.

रोहित पवार यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता रोहित पवार हे ईडीच्या दक्षिण मुंबईतील बॅलोर्ड पीयर येथील कार्यालयात दाखल झाल्यानंतर तर थेट रात्री 10.15 च्या आसपास ते कार्यालयाच्या बाहेर आले.

त्यावेळी रोहित पवार यांच्यासोबतीला खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील होते. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.

follow us

वेब स्टोरीज