Download App

पुण्यात RTO ची दबंगगिरी, विद्यापीठात घुसून वाहनांवर कारवाई

पुणे : वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याचे आढळल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणजेच RTO संबंधित वाहनावर कारवाई करते. आजवर या कारवाया आपण रस्त्यांवर पाहिल्या देखील असतील. मात्र पुण्यात एक अजबच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घुसून RTO ने विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसूली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. विशेष म्हणजे RTO च्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे वाहनधारकांसाठी बंधनकारक असते. मात्र अनेकांकडून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाते. यातच RTO देखील अशा वाहनांवर कारवाई करत असते. मात्र आजवर RTO कडून अशा वाहनांवर रस्त्यांवर, सिग्नलवर कारवाई केल्याचे आपण देखील पहिले असेल. मात्र RTO ने थेट विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

नेमका काय प्रकार घडला? जाणून घ्या
आज RTO अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सक्तीने वसूली केल्याचे घडले . काही विद्यार्थ्यांना 5 हजार तर काही विद्यार्थ्यांना 1 हजार रूपये चलन पावत्या देण्यात आल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यापीठाच्या आतमध्ये RTO अधिकारी वर्गास येण्याची परवानगी असते का ? अशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर कॉलेज परिसरात कार्यवाही करता येते का ? असे सवाल आता विचारले जाऊ लागले आहे.

खुनी दरोडा घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जेरबंद

तसेच या अधिकारी वर्गास विद्यापीठ प्रशासनाने परवानगी दिली होती का ? तसे नसेल तर मग विद्यापीठाचा सुरक्षा विभाग काय काम करतो आहे. विद्यापीठात अशा पद्धतीने विद्यार्थी, पालक यांच्यावर कार्यवाही होणे अतिशय चुकीचे असल्याचे मत यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. या सर्व प्रकारस विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे असा आरोप देखील विद्यार्थ्यांकडून केला जातो आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना होऊ शकते अटक… जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

दरम्यान या प्रकरणी RTO च्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क काही होऊ शकला नाही आहे. RTO ने केलेल्या या कारवाईवरून विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला. एकीकडे हे सगळं सुरु असताना मात्र दुसरीकडं या बेवारस विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलगुरू कधी मिळणार ? विद्यार्थ्यांची लूट कधी थांबणार ? असे प्रश्न आता पालकांसह विद्यार्थ्यांकडून विचारले जाऊ लागले आहे.

Tags

follow us