Rupali Thombare offer Ravindra Dhangekar to come with NCP : माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचे काँग्रेसमधील (Congress) स्थान सध्या डळमळीत झालंय. ते काँग्रेस सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ते शिवसेनेत (Shivsena) जाण्याची शक्यता आहे. कारण गेल्या दिवसांमध्ये त्यांच्या हालचाली तशा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेत त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
‘या’ बॅंकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा! 25000 रूपयांपर्यंतची रक्कम काढण्यास आरबीआयची परवानगी
याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये रूपाली ठोंबरे म्हणाल्या की, माजी आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पण विचार करू शकता. तुम्ही हाडाचे कार्यकर्ते आहात. सक्षम लोकप्रतिनिधी आहात. निवडणुकीत हारजीत चालूच असते. पण नेतृत्व कामाची पद्धत थांबत नसते भाऊ तुझ्यासोबत काम केले आहेत. काही दिवसांपासून बातमी येत आहे की, तुम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात.
कार्यकर्त्यांची मीटिंग सुरू आहे.
अमेरिकेनंतर आता भारतीयांना कॅनडातूनही बाहेर पडावे लागणार; स्टडी व वर्क परमीटबाबत घेतला मोठा निर्णय
कुठे प्रवेश करायचे याबाबत चर्चा करणार आहात? त्यामुळे मी म्हणेल की रवी भाऊ अजितदादांचे आणि तुझ्या संबंध नेहमी चांगले आहेत ते तू अनुभवलेले आहेत तुझ्यासारखे काम करणाऱ्या सक्षम सर्वांना एकत्रित घेऊन काम करणारा हाडाचा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विचार करावा. अशी कार्यकर्ता बहीण म्हणून माझी विनंती असेल बाकी पक्ष वेगळे असते तरी हाडाचे कार्यकर्ते काम करणारे सक्षम लोकप्रतिनिधी बहिण भावाचे नाते कायम आहेच. असं म्हणत ठोंबरेंनी त्यांना ऑफर दिलीय.
रविंद्र धंगेकरांचा शिवसेनेत ‘उदय’ होणार ?
धंगेकरांचा काँग्रेसमधून ‘अस्त’ तर शिवसेनेत ‘उदय’ होण्याची शक्यता आहे. धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी स्वतः उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. त्या भेटीचे फोटो उदय सामंत यांनी ट्विट केले आहेत. 20 फेब्रुवारीला रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत व रविंद्र धंगेकर यांनी एकत्रित साजरा केला.
तर कालच रवींद्र धंगेकर यांनी गळ्यात भगवा टाकलेला स्टेटस चर्चेत आला होता. रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या स्टेट्सला गळ्यात भगवं उपरणं घातलेला एक फोटो ठेवला होता. तसेच त्या फोटोवर स्टेट्सला ‘तेरे क़दमों के तले मिट्टी भी सोना बन गयी, जर हुआ दुश्मन जहाँ शमशीर तेरी तन गयी…’ हे गाणे ठेवले. त्यामुळे धंगेकर यांच्या स्टेट्सची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगलीय. त्याच आता मुलाचा वाढदिवसही मंत्री सामंतबरोबर साजरा केला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे कधीही काँग्रेस सोडू शकतात, असे तर्कवितर्क लावले जात आहे.