मांजरी-केशवनगरमध्ये शिवसेनेचा ठसा; 100 कोटींच्या विकासकामांमुळे नागरिकांना विश्वास

मांजरी बुद्रुक-केशवनगर परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक विकासकामे करण्यात आल्याची माहिती.

Untitled Design   2026 01 10T141943.313

Untitled Design 2026 01 10T141943.313

Sandeep Lonkar informed that development works worth Rs 100 crore : मांजरी बुद्रुक-केशवनगर परिसरात शिवसेनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 100 कोटी रुपयांहून अधिक विकासकामे करण्यात आल्याची माहिती शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांनी दिली. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनेलप्रमुख अमर घुले, विकी माने आणि विशाल ढोरे यांनी या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान दिल्याचे लोणकर यांनी सांगितले. या कामांमुळे परिसराचा सर्वांगीण विकास झाल्याचे नागरिकही मान्य करत आहेत. दरम्यान, शिवसेना उमेदवार संदीप लोणकर यांनी आज मार्गदर्शक आणि कार्यकर्त्यांसह केशवनगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या पदयात्रेची सुरुवात उमेदवार संदीप लोणकर यांच्या कार्यालयापासून झाली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग केल्याच्या तब्बल 186 तक्रारी दाखल

प्रभाग क्रमांक 15 अंतर्गत येणाऱ्या मांजरी बुद्रुक, केशवनगर, साडेसतरानळी आणि शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त केला. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ‘अ’ गटातील उमेदवार राजश्री माने, इतर मागास प्रवर्ग ‘ब’ गटातील उमेदवार संदीप लोणकर, सर्वसाधारण महिला प्रवर्ग ‘क’ गटातील उमेदवार सीमा घुले तसेच सर्वसाधारण प्रवर्ग ‘ड’ गटातील उमेदवार नीलेश घुले हे सर्वजण “आमच्या हक्काची माणसे आहेत”, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या पदयात्रेत माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले, विशाल ढोरे, अमर घुले, सुधीर घुले, विकी माने, विजय कामठे, अक्षय तारू, दीपक कुलाळ, पंकज पवार, कांचन लोणकर, सुनीता इंगळे, आशा ढमढेरे, श्वेता लोणकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

Exit mobile version