राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे.(Sunetra Pawar) अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे सुत्र कुणाकडं अशी चर्चा सुरू असतानाच अता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडदिलीप वळसे-पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन. त्यानंतर हा प्रस्तान एकमताने मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण 42 आमदार आहेत.
LIVE – सुनेत्रा पवार होणार उपमुख्यमंत्री; विधिमंडळ गटनेते पदी निवड
यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्याचं अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सोपवतील. त्यानंतर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील. आज दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्तावर मांडला. त्याला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर अन्य आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करायला समर्थन दिलं.
सुनेत्रा पवार यांच्याकडे कुठली खाती?
अशा पद्धतीने सुनेत्रा पवार यांची निवड झाली. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा राज्यपाल भवनात शपथविधी पार पडणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडं कुठल्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडून सोपवण्यात येईल या बद्दल सध्या तरी काही माहिती नाहीय. त्या आधी राज्यसभेत खासदार होत्या.
