Download App

जो भ्रष्टाचार करत नाही त्याला भाजपात स्थान नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Rahul kul : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)हे भीमा पाटस साखर कारखान्याच्या (Bhima Patas Sugar Factory)संदर्भात आक्रमक झाले आहेत. भाजपचे (BJP) आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यांनी कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी आपल्याकडे त्याचे पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांनी राहुल कुलांवर 50 हजार गुन्हे दाखल करा, असंही आवाहन केलं आहे. यावेळी राऊतांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, जो भ्रष्टाचार करत नाही त्याला भाजपात स्थान नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.

बारसू रिफायनरीसाठी शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल…

राहुल कुलचं माझं वैयक्तिक भांडण नाही. येथे बसलेल्या कोणाचही त्यांच्याशी वैयक्तिक भांडण नाही. पण आपण 50 हजार शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. भीमा सहकारी साखर कारखाना भंगारात जात आहे. पाटसमध्ये कलम 144 लावण्यात आले आहे. त्यावरुनही संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

आपण दोन महिण्यांपासून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis)वेळ मागत आहे. पण मला ते वेळ देत नाहीत. शेवटी सीबीआयकडे (CBI) तक्रार दाखल करणार. इडीकडे तक्रार दाखल करणार आहे. 2024 ला आपलंच सरकार येणार आहे. त्यावेळी आपण त्यांना पाहून घेऊ, असंही संजय राऊत म्हणाले. राहुल कुल यांनी 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. यालाच मनी लॉन्ड्रींग म्हणतात, असंही राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना जेलमध्ये पाठवले. त्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये टाकले.

त्याचवेळी खासदार राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोरी करुन गेलेल्या आमदारांवरुनही भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या 40 आमदारांपैकी 12 आमदार भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. मात्र भाजपने त्यांना आपल्या बाजूने घेतले. आणि त्यांना भ्रष्टाचारमुक्त केल्याचा आरोप केला आहे. यावरुन त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवरही जोरदार निशाणा साधला आहे.

Tags

follow us