Sarvajanik Ganesh Visarjan Miravnuk In Pune : गेल्या 25 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत. अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी जमली होती. डीजेने अलका चौक दणाणला. आतापर्यंत 140 मंडळ अलका चौकातून विसर्जनाला गेले. कुमठेकर रोड, लक्ष्मी रोडवरून अजून ही मंडळ सुरू आहेत. अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी आहे. यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता आहे. काल बरोबर साडे नऊ वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक सुरू झाली होती.
आनंदाच्या वातावरणात गणपती बाप्पााला निरोप देण्यात येत (Ganeshotsav 2025) आहे. पुण्यात विसर्जन मिरवणुकीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा देखावा पाहायला मिळाला. विसर्जन मिरवणुकीत पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांचे बॅनर झळकले. वर्दीतला देवमाणूस, (Pune) असं वरती लिहून खाली अमितेश गुप्ता यांचे कार्टून आर्ट फोटो लावण्यात आला होता. वर्दीतला देवमाणूस, अशी देखाव्याची संकल्पना (Ganesh Visarjan Miravnuk) होती. वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळवून देण्याचा कार्टून आर्टवर आशय होता. पुणे पोलिसांना जय भारत मंडळाकडून अनोखी मानवंदना देण्यात आली.
पुणे, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात श्रीमंत भाऊ रंगारी गणपतीचे विसर्जन झाले. पहाटे 3 वाजून 51 मिनीटांनी पांचाळेश्वर घाटावर बाप्पााला निरोप देण्यात आला. यावेळी विश्वस्त उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते बाप्पाची आरती करून विसर्जन करण्यात आले. तर दुसऱ्या काही विसर्जन मिरवणुकांमध्ये निष्ठावंत शरद पवार असे पोस्टर देखील झळकले.
शरद पवारांचा फोटो आणि त्याखाली निष्ठावंत असं लिहण्यात आलं होत. साखळी पीर तालीमकडून विसर्जन मिरवणुकीत हे पोस्टर दाखवण्यात आले. काका मला नाही, आधी या पुण्याला वाचवा’- असा आशय या बॅनरवर होता. पुण्यात विसर्जन मिरवणुकीतील देखाव्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. पुण्यातील संभाजी मित्र मंडळाच्या देखाव्यात देखील एक पोस्टर असं होतं, ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. पुण्याच्या महागणेशोत्सवाचा महानिधी कुणाच्या पोटात गेला? असा आशय या बॅनरवर होता.