राष्ट्रवादीत मंत्रि‍पदासाठी रस्सीखेच, शेळके म्हणाले, मी जबाबदारी घ्यायला तयार…

Sunil Shelke यांनी मंत्रिपदासाठी शड्डू ठोकला.कोकाटेंच्या जागी मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असताना त्यांनी हे वक्तव्य केलं

Sunil Shelke

Sunil Shelke

Scramble for ministerial posts in NCP after Kokates resignation Sunil Shelke desire : शासकीय कोट्यातील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयानेही कायम ठेवली आहे. त्यानंतर माणिकराव कोकाटेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाने जरी त्यांना जामीन मंजूर केला असला तरी त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे. ती कोकाटेंच्या जागी मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याची. यामध्ये धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक आणि सना मलिकांच्या नावाची चर्चा असताना आता राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराने मंत्रिपदासाठी शड्डू ठोकला आहे.

राष्ट्रवादीच्या या आमदाराला मंत्रिपदाची आपेक्षा

माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आता हे मंत्रिपद अजित पवारांकडे आहे. मात्र आता हे पद कुणाला मिळणार यासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यामध्ये बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागणारे धनंजय मुंडेंची मंत्रिपदासाठी तीव्र इच्छा असल्याचं बोललं जात आहे. यासाठी ते दिल्लीमध्ये अमित शाहंना भेटायला गेले असल्याचं देखील बोलल जात आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये भाजपला भरघोस यश; मोदींकडून मराठीत ट्विट करत जनतेचे आभार

दुसरीकडे हे पद इंद्रनील नाईक किंवा नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना देखील दिले जाणार आहे. त्यात आता राष्ट्रवादीच्या मावळ विधानसभेचे आमदार यांनी दखील मंत्रिपदाची इच्छा व्यक्त करत शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ते देखील या स्पर्धेत आले आहेत. गेल्या वेळी देखील त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे आता त्यांची इच्छा पुर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले सुनील शेळके?

यावर बोलताना शेळके म्हणाले की, मला सांगता येणार नाही. कारण आमचे नेते आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार , तटकरे आणि भुजबळ यांच्यासह प्रमुख नेते यावर निर्णय घेतील. तसेच कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादीचे अनेक जण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पण मी दादा जो निर्णय घेतील त्याचं स्वागत करणारा कार्यकर्ता आहे.

‘काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून काम केलं’, पराभवानंतर आमदार रोहित पवार प्रचंड संतप्त

तसेच ते पुढे म्हणाले की, महत्त्वकांक्षा कुणाला नसते. पण ती ठेवताना पक्षश्रेष्ठींचा निर्णय ही मान्य केला पाहिजे. तसेच राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दादा संधी देत आहे. त्यामुळे आगामी काळात मला संधी मिळेल. एवढी आपेक्षा आहे. मी 2024 ला निवडणूक झाली तेव्हा देखील जबाबदारी घ्यायला तयार होतो. पण असे वक्तव्य करणं योग्य नाही.

Exit mobile version