सात हॉटेल परवाने निलंबित; पुण्यातील हॉटेल-रेस्टॉरंट चालकांना एफडीएचा दणका !

FDA : तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन, काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित.

FDA Pune

FDA Pune

पुणे : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त (Tukaram Munde) यांनी भेसळयुक्त अन्न देणाऱ्या, अस्वच्छ असणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट चालकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी हॉटेल-रेस्टॉरंटचे तपासणी करत आहेत. त्यात अनेक ठिकाणी ग्राहकांच्या जीवनाशी खेळ खेळले जात आहे. अस्वच्छ अन्न, भेसळ, कलरचा वापर केला जात असल्याचे आढळून आले आहेत. पुण्यात सात हॉटेल-रेस्टॉरंटचे परावने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने ‘Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 1 ते 3 जुलैदरम्यान 70 हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. या तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

दोषींना कठोर शिक्षा द्या; राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावर संघाची पहिली प्रतिक्रिया

‘या’ हॉटेलवर कारवाई
निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल 360 बावधन, पुणे यांचा समावेश आहे.

422 ग्रॅम सोने अन् 1.5 कोटींची कॅश ; अकोलाच्या लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात आणखी काय- काय?


तुम्हाला तक्रार करायचे, टोल फ्री क्रमांकावर साधा संपर्क

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

Exit mobile version