तुकाराम मुंढेंचा दणका; गुळात साखरेची भेसळ आढळली, राज्यभरात तब्बल 97 लाखांचे वेगवेगळे पदार्थ जप्त
Tukaram Munde- गेल्या दोन दिवसांत झालेल्या कारवाईत राज्यभरात 97 लाख रुपयांचा अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
Tukaram Munde: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोर, दिशाभूल जाहिराती करून आयुर्वेदिक औषधे विकणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या कारवाईत राज्यभरात 97 लाख रुपयांचा अन्न पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
वेगवेगळे भेसळयुक्त पदार्थ जप्त करण्यात आलेत. त्यात आंबे, बंधी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कॅडी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईसक्रीम, गुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाल्यांचे पदार्थ, शेंगदाणे चिक्की व तसेच भेसळीसाठी वापरण्यात येत असलेल्या पदार्थ असा 84 हजार किलो इतका साठा जप्त करण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंनी माझ्यावर गोळीबार केला; धनंजय देशमुख यांच्या आरोपांनी खळबळ
गुळामध्ये साखरेची भेसळ
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील तीन गुळ निर्मिती कारखान्यावर छापे टाकले. त्यात गुळामध्ये साखरेची भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे. तिन्ही ठिकाणी तब्बल दहा लाख 66 हजार रुपयांची किंमतीच्या गुळाचा 15 हजार किलो साठा जप्त करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील एमपीएससी मार्केटमध्ये कृत्रिमरित्या आंबे पिकविण्यासाठी इथिलीन स्प्रे व संशयीत द्रवाचा वापर करताना आढळून आले आहे. येथून तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांची आंबे जप्त करण्यात आले आहे.
विधानपरिषदेत महायुती-मविआला बंडखोरीचे ग्रहण; नेत्यांनी पक्षादेश झुगारला, कुणी-कुणी केली बंडाळी
आरोग्याशी खेळ करणाऱ्याविरुद्ध कठोर फौजदारी कारवाई करणार
अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली गुन्हे करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संगिता 2023 च्या कलम 129 अंतर्गत चाप्टर केसेस दाखल करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात येणार आहे. तसेच पुन्हा गुटखा, विक्री करून व अन्नात भेसळ करून गुन्हा केल्यास त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.
पानमसाला विक्रेत्यांना दणका
मागील दोन दिवसात राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. त्यात 32 आरोपींना अटक करण्यात आली असून, 26 दुकाने सील करण्यात आले आहेत. त्यात कोकण विभागात तब्बल 16 दुकानांवर कारवाई करत 16 जणांना अटक करण्यात आली आहे