पुण्यात पोलीस व्हॅनला भीषण अपघात, एका मागून एक 7 गाड्यांना उडवलं, काय घडलं?

संबंधित घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

News Photo   2026 08 03T150501.040

पुण्यात पोलीस व्हॅनला भीषण अपघात, एका मागून एक 7 गाड्यांना उडवलं, काय घडलं?

पुण्यात सदाशिव पेठ परिसरात पोलीस (Police) व्हॅनचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने आलेल्या व्हॅनने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांना धडक दिल्याने एकूण सात वाहनांचे नुकसान झाले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेतील गजबजलेल्या रस्त्यावरून जात असताना एका पोलीस व्हॅनवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर व्हॅनने रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. धडकेचा आवाज होताच परिसरातील नागरिक आणि दुकानदार घटनास्थळी धावले.

अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांचा अचानक हल्ला; जीव वाचवण्यासाठी नातेवाईकांची पळापळ, मृतदेह चितेजवळच पडून

या अपघातात सात वाहनांचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी संबंधित वाहनांच्या आसपास नागरिक नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस व्हॅन वाहनांना धडक देताना दिसत आहे. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. वाहनात तांत्रिक बिघाड झाला होता की इतर कोणते कारण होते, याचा तपास सुरू आहे.

ही घटना काही दिवसांपूर्वी घडल्याचे सांगितले जात असून, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाची अधिक चर्चा सुरू झाली आहे. संबंधित घटनेबाबत पोलीस प्रशासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पोलिसांच्याच गाडीने अशाप्रकारे सात वाहनांना उडवल्याने यावर पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

Exit mobile version