Download App

शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….

Sharad Mohol : लवासा सिटी प्रकरणी दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणाच्या आरोपात कारागृहात असतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) स्वत:च्या मुठा गावचा उपसरपंच झाला होता. गुन्हेगारी विश्वास नाव मिळवल्यानंतर शरद मोहोळची इतकी दहशत वाढली की त्याच्याविरोधात कोणी बोलायलाही तयार नव्हतं. अशा परिस्थितीतून थेट कारागृहातूनच त्याने गावच्या निवडणुकीचे सुत्र हलवत बिनविरोध उपसरपंच होण्याचा मान मिळवला होता.

कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !

नेमकं घडलं असं की, 2011 साली लवासा सिटीपासून जवळच असलेल्या दसवे गावचे तत्कालीन सरपंच शंकर धिंडले यांचे शरद मोहोळने अपहरण केलं होतं. अपहरण करुन त्यांच्याकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. त्यानंतर काही पैसे मोजल्यानंतर मोहोळने सरपंचाची सुटका केली मात्र, पोलिसांनी शरद मोहोळसह त्याच्या साथीदाराच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती.

याचवेळी कारागृहात असताना शरद मोहोळ आणि दहशतवादाचा आरोप असलेला कातिल सिद्धिकी याच्यासोबत मोहोळचा वाद झाला. एकमेकांकडे बघण्यावरुन झालेल्या वादाचं रुपांतर शेवटी हत्येत झालं. मोहोळने साथीदाराच्या मदतीने सिद्धीकीची नाडीने गळा आवळून हत्या केली. एका दहशतवाद्याला मारल्यानंतर शरद मोहोळची एक राष्ट्रभक्त असल्याची प्रतिमा समाजासमोर तयार झाली.

YS Sharmila : काँग्रेसशी वैर पत्करत भावाला CM केलं होतं; वायएस शर्मिला पडद्यामागच्या ‘किंगमेकर’

परिणाम म्हणून अनेक सामाजिक, धार्मिक, संघटना त्याच्या कुटुंबियांना कार्यक्रमांचं निमंत्रण द्यायला लागली. अनेक कार्यक्रमात त्याला मान सन्मान मिळू लागला. याचवेळी मुठा गावात ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शरद मोहोळ याने बिनविरोध उपसरपंचपद मिळवलं आहे. कारागृहात असताना गावचं उपसरपंचपद मिळवल्याने त्याच्या दहशत किती असेल? याची प्रचिती येते.

मोठी बातमी : कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या

जामिनावर बाहेर आल्यानंतर शरद मोहोळची राजकारणाशी नाळ जुळली. पत्नी स्वाती मोहोळ यांचा भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. या प्रवेशाने शरद मोहोळसह समर्थकांचं पाठबळ मिळेल, असा अंदाज चंद्रकांत पाटील यांनी लावला होता. तर राजकारणात पत्नीच्या माध्यमातून शरद मोहोळ सक्रिय झाला.

2006 ते 2024 असा शरद मोहोळच्या गुन्हेगारीचा कालखंड ठरला आहे. संदीप मोहोळ हत्येनंतर शरद मोहोळच्या गुन्हेगारीचं पर्व सुरु झालं होतं. जसं आपण मुळशी पॅटर्न चित्रपटात पाहिलं अगदी त्याचं पद्धतीने शरद मोहोळचा साथीदार असलेला मुन्ना संतोष पोळेकर याने साथीदारांसह त्याचा गेम केला आहे.

follow us