पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. पुणे-सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून आठ जणांना पकडले आहे.
शरद मोहोळ कारागृहात असतानाच बिनविरोध उपसरपंच झाला होता….
शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनला खून करणे, भारतीय हत्यार कायदा कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर पुणे शहर गुन्हे शाखेच्या नऊ पथकांनी तपास सुरू केला होता. ही पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने तपास करत होती. पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहे.
कुख्यात गुंड मोहोळची हत्या कुणी केली ? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट तपासाची दिशाच सांगितली !
शरद मोहोळ याची हत्या जमिनीच्या, पैशाच्या जुन्या वादातून आरोपीनी केला असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. मोहोळ याच्यावर गोळीबार करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
शरद मोहोळ याची आज भर दुपारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून, आता या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मोहोळच्या घरी एकत्र जेवण केले होते.आज मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता.जेवण झाल्यानंतर हे सर्व बाहेर पडले होते. शरद मोहोळ पुढे तर आरोपी त्याच्या मागून चालत होते. त्यावेळी मागून चालणाऱ्या आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्यांच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यात आरोपींनी चार राऊंड फायर केले त्यातील पहिली गोळी पायाला, दोन गोळ्या पाठीवर लागल्या. त्यावेळी कुणी हल्ला केला हे बघण्यासाठी शरद मोहोळ मागे वळला असता आरोपींनी चौथी गोळी झाडली जी मोहोळच्या थेट छातीवर लागली. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्या आले. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.