Download App

Sharad Mohol हत्येप्रकरणी आणखी तिघे ताब्यात; मारण्यासाठी गोळीबाराचा सराव केल्याचं समोर

Sharad Mohol : काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात दिवसाढवळ्या हत्या झाली होती. शरद मोहोळचा नुकत्याच झालेल्या साथीदारानेच म्हणजे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे या दोघांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. तर प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवतआरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनी शुक्रवारी आणखी तिघांना अटक केली.

भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले

यामध्ये आदित्य गोळे (वय 24 वर्ष) नितीन खैरे (वय 34 वर्ष ) या दोघांसह आणखी एकाचा समावेश आहे. या आरोपींनी मोहोळच्या खुनासाठी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केल्याचं समोर आलं आहे. मोहोळच्या खुनाच्या एक महिन्यापूर्वी त्यांनी हा सर्व कट रचला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासोबत हजर होता. तसेच या सर्व कटासाठी पैशाची व्यवस्था ही नितीनने केली होती. तर आदित्यने बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. तसेच तिसरा आरोपी हा फोन द्वारे या सर्व आरोपींच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.

Box Office: ‘मेरी ख्रिसमस’ ठरणार कतरिनाचा सगळ्यात कमी ओपनिंग करणारा चित्रपट?

त्याचबरोबर शरद मोहोळच्या हत्याकांडाचा तपासाचा साताऱ्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. कारण साताऱ्यामधील कराडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. धनंजय मारुती वटकर असे या आरोपीचे नाव असून त्याने या मुख्य आरोपींना पिस्तूल पुरवल्याचा त्याच्यावरती संशय आहे. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये आतापर्यंत पोलिसांनी 13 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कारसेवकांचं स्वप्न पूर्ण होतंय, तेव्हा बाकीच्या भानगडीत न पडता…’; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

तसेच या प्रकरणामध्ये नवनवीन माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शरद मोहोळ याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. मात्र आरोपींना यश आले नाही. त्यासाठी या गुन्ह्यातील इतर आरोपींची दोन्ही आरोपी वकिलांबरोबर बैठक झाली होती. अॅड. उढाण याचे या हत्याकांडातील आरोपीशी खून करण्यापूर्वी बोलणं झालं होतं असं पोलिसांच्या तपासतात समोर आलं आहे.

follow us