Download App

मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं; स्वाती मोहोळ यांच्या भेटीपूर्वी नितेश राणेंचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा 5 जानेवारी रोजी भरदुपारी कोथरूड परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. त्यानंतर काल (दि.7) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची शरद मोहोळच्या पत्नी आणि भाजप पदाधिकारी स्वाती मोहोळ यांनी भेट घेत न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानंतर आज (दि.8) भाजप आमदार नितेश राणे दुपारी साडे चार वाजता स्वाती मोहोळ यांची भेट घेणार आहेत मात्र, त्यापूर्वी राणेंनी मोहोळ कुटुंब हे हिंदुत्वासाठी सातत्याने लढणारं आणि झटणारं कुटुंबीय असल्याचे म्हटले आहे.

Video : गल्लीत कांदे विक्रेत्यांचा आवाज, विद्यार्थ्यांची लगबग अन् मोहोळचा ‘गेम’; CCTV फुटेज आलं समोर

राणे म्हणाले की, मोहोळ कुटुंबिय हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणारं, संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे. माझी आजची भेट ही कोणतीही राजकीय नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. ही भेट कौटुंबिक असून, या संकटाच्या काळात स्वाती मोहोळ यांच्या पाठीमागे उभ राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे. या भेटीच्या माध्यामातून त्यांना आधार देण्याचे काम आमच्या माध्यमातून करणार असल्याचेही यावेळी राणेंनी सांगितलं. जे जे हिंदुत्ववादी विचाराचं काम प्रखरतेने करतात त्यांच्या बाजूने उभं राहणे ही आमची संस्कृती असल्यामुळे मी स्वाती मोहोळ यांच्या त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेणार आहे.

मोठी बातमी : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पूर्णविराम; हायकोर्टाच्या आदेशाला SC ची स्थगिती

आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

शरद मोहोळ खून प्रकरणात पकडण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी मुख्य आरोपी साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर (वय २० वर्ष), नामदेव महीपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहु शेळके, विनायक संतोष गाव्हणकर, विठ्ठल किसन गांदले यांना दहा जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर अॅड. रविंद्र वसंतराव पवार व अॅड. संजय रामभाऊ उडान या दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

सुतारदरा परिसरात भर दुपारी नेमकं काय घडलं?

शरद मोहोळ याचा 5 जानेवारी 2023 रोजी भर दुपारी गोळ्या झाडून खून करण्यात आला. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मोहोळच्या घरी एकत्र जेवण केले होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशी मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन करून शरद मोहोळ आणि त्याचे अन्य साथीदार बाहेर पडले होते.

घरातून बाहेर पडल्यानंतर शरद मोहोळ पुढे तर आरोपी त्याच्या मागून चालत होते. त्यावेळी मागून चालणाऱ्या आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने त्याच्याकडील बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. यात आरोपींनी चार राऊंड फायर केले त्यातील पहिली गोळी पायाला, दोन गोळ्या पाठीवर लागल्या. त्यावेळी कुणी हल्ला केला हे बघण्यासाठी शरद मोहोळ मागे वळला असता आरोपींनी चौथी गोळी झाडली जी मोहोळच्या थेट छातीवर लागली. या सर्व घटनेत शरद मोहोळ गंभीर झाला होता. त्यानंतर त्याला तत्काळ जवळ असणाऱ्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

follow us