Swati Mohol News : माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघिण असल्याचा इशारा कुख्यात गुंड शरद मोहोळची (Shard Mohol) पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी दिला आहे. तीन दिवसांपूर्वीच पुण्यात शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Disqualification MLA : अरं बाबा…त्याचा माझा काय संबंध; नरहरी झिरवळांनी अंगच झटकलं
स्वाती मोहोळ म्हणाल्या, माझा सरकारवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या पतीबाबत जी घटना घडली आहे, ते हिंदुत्ववादी काम करत असल्यामुळेच घडली आहे, पण समोरच्या लोकांना वाटत असेल की, असं करुन मी खचून जाईल, तर त्यांना एकच सांगण की मी हिंदुत्ववाद्याची बायको असून माझा नवरा वाघ होता, मी त्याची वाघिण…हिंदुत्वासाठी मरण येत नाही तोपर्यंत लढणार असल्याचं स्वाती मोहोळ यांनी स्पष्ट केलं आहे.
Golden Globe: ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार सोहळ्यात ‘या’ सिनेमांनी मारली बाजी! पाहा विजेत्यांची यादी…
स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांची भेट घेतली?
शरद मोहोळची दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिने पुण्यातच गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आपल्या पतीचा हत्येबाबत त्यांनी फडणवीस यांना सविस्तर माहिती दिली आहे. स्वाती मोहोळ यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्या भाजपच्या पदाधिकारीही आहेत.
दरम्यान, स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आज भाजपचे आमदार नितेश राणेंनीही त्यांची घरी जात भेट घेतली आहे. यावेळी नितेश राणे यांनी शरद मोहोळ यांचा हिंदु समाजासाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख करीत आठवणींना उजाळ दिला आहे. मोहोळ कुटुंबिय हे हिंदुत्वासाठी सातत्याने झगडणारं, संघर्ष करणारं आणि हिंदुत्वासाठी भक्कम पद्धतीने भूमिका घेणारं कुटुंब आहे. माझी आजची भेट ही कोणतीही राजकीय नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. ही भेट कौटुंबिक असून, या संकटाच्या काळात स्वाती मोहोळ यांच्या पाठीमागे उभ राहणं त्यांना आधार देणं हे हिंदू म्हणून माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मी त्यांची भेट घेणार आहे. या भेटीच्या माध्यामातून त्यांना आधार देण्याचे काम आमच्या माध्यमातून करणार असल्याचेही यावेळी राणेंनी सांगितलं.