Disqualification MLA : अरं बाबा…त्याचा माझा काय संबंध; नरहरी झिरवळांनी अंगच झटकलं

Disqualification MLA : अरं बाबा…त्याचा माझा काय संबंध; नरहरी झिरवळांनी अंगच झटकलं

Disqualification MLA : अरं बाबा त्याचा माझा काय संबंध, तेव्हा मी होतो पण आता नाहीये, या शब्दांत आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी अपात्र आमदार प्रकरणातून अंग झटकलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा येत्या 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निकाल जाहीर करणार आहेत. निकालाआधीच आमदार अपात्र प्रकरणावर सवाल केला असता नरहरी झिरवळांनी हे विधान केलं आहे. नाशिकमधून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

PM Modi यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपच्या पर्यटनाला चालना; प्लॅटफॉर्म सर्चमध्ये 3,400 टक्क्यांनी वाढ

नरहरी झिरवळ म्हणाले, आमदार अपात्र प्रकरणाचा आणि माझा काय संबंध? मी तेव्हा ठाम होतो, आता मी तिथे नाही, मी काय बोलणार? असं उत्तर नरहरी झिरवळांनी अपात्र आमदार प्रकरणी दिलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणावर येत्या 10 जानेवारी रोजी 4 वाजता निकाल हाती येणार आहे. सर्वत्र अपात्र आमदार प्रकरणाची चर्चा सुरु असून नेमका काय निकाल लागतो? याकडंच लक्ष लागून राहिलं आहे.

सत्तासंघर्षाच्या निर्णयामध्ये ठाकरे गट की शिंदे गट अपात्र होणार? यावर पुढील दोन दिवसात निर्णय होणार आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने निकाल देत आता हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून सुनावणी घेतल्यानंतर आता येत्या 10 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर निकाल देण्याची शक्यता आहे. अशातच नार्वेकर हे आजारी पडल्याचीही चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून विरोधकांनी राहुल नार्वेकर यांना चांगलंच घेरलं आहे.

मोदींवरील टीका भोवली! मालदीवला जाणाऱ्या सर्व प्लाईट्स बुकिंग रद्द, EaseMyTripचा मोठा निर्णय

शिवसेनेच्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी महायुतीत सामिल होत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर अपात्र आमदार प्रकरणाचा निर्णय सोपवला. त्यानंतर राहुल नार्वेकरांच्या देखदेखीखाली विधी मंडळात सुनावणी पार पडली आहे. अखेर सत्तासंघर्षाच्या ऐतिहासिक निर्णयाचा मुहूर्त ठरला आहे.

सत्तासंघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. दि. 11 मे रोजी एकनाथ शिंदे गटाच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय देण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालाच्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांच्यासमोर विधी मंडळात ही सुनावणी सुरु होती. या सुनावणीमध्ये दिरंगाई केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून जात होता. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाकडून म्हणणं सादर करण्यात आलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 31 डिसेंबरलपर्यंत अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल देण्यात यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला खरा पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची मुदत वाढवून दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube