Download App

आव्हाड आणि परांजपे यांना शरद पवारांनी राजीनाम्यानंतर काय सांगितलं?

Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांना शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले, असा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जतच्या मेळाव्यात केला होता. माझ्यात माझे निर्णय घेण्याची कुवत आहे, असे शरद पवार यांनी सुनावले.

मी राजीनामा देतो असं म्हणायचं कारण काय? मी राजीनामा दिला आणि मला परत करायचा असेल तर जितेंद्र आव्हाड किंवा आनंद परांजपे यांच्या परवानगीची गरज नाही. माझ्यात माझे निर्णय घेण्याची कुवत आहे,. राजीनामा देण्याचा प्रश्नच नव्हता, आमच्यात वेगवेगळ्या चर्चा होत्या. पण कोणाच्या सांगण्यावरुन राजीनामा देतो अशी स्थिती नव्हती, असे शरद पवार यांनी सांगितले.

अजितदादांच्या बोलण्यात सत्यता नाही; काऊंटर फायर करत पवारांनी फेटाळले सर्व दावे

ते पुढ म्हणाले की पक्षाचा अध्यक्ष मी होतो, सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयाच्या बरोबर काही वेगळं करण्याचे कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की भाजपसोबत जायचे नाही. कालच्या भाषणात असं एक सांगितलं गेलं की अनिल देशमुख यांना देखील भाजपसोबत जायचं होतं. पण देशमुखांनी काल लगेच जाहीर केलं की असं मत मी कधी मांडलं नाही. एवढच नाही तर हा रस्ता आपला नाही हे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले होते. ते असं सांगत असताना देखील त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे योग्य नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.

कोणी सोडून गेलं म्हणून चिंता करण्याचे कारण नाही, संघटना स्वच्छ झाली, पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपण लवकरच पुस्तक लिहून गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार म्हणाले की पटेलांच्या पुस्तकाची मी वाट बघतोय. प्रफुल्ल पटेलांकडे पुस्तक लिहिण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. पटेलांनी लोक पक्ष सोडून का जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं, ईडीच्या कारवाईवरही त्यांनी पुस्तक लिहावं.

Tags

follow us