पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून महापुरुषांविषयी तुलना केली आहे. त्यातच आता प्रा. हरी नरके यांनी देखील शोध घेतले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj ) व सयाजीराव गायकवाड यांच्याशी केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पुण्यातील सासवड येथे ही सत्यशोधक समाज परिषदेने कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे. बाबा आढाव हे आजचे महात्मा फुले असून शरद पवार हे आजचे शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड आहेत, अशी तुलना केली.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, डॉ. बाबा आढाव, प्रा. प्रकाश पवार, संभाजीराव झेंडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर व भाजपवर देखील टीका केली. स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचे काहीही योगदान नाही. यांच्या ओठावर राम आणि मनामध्ये नथूराम आहे.
तसेत शरद पवारांमुळे महात्मा फुलेंचे साहित्य हे इतर तेरा भाषांमध्ये प्रकाशित झाले. पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी यासाठी विशेष समिती गठित केली होती, अशी माहिती त्यांनी बोलताना दिली.