Download App

Sharad Pawar : आमदारांना फोडून भाजपने ठाकरेंची सत्ता घेतली… जनता धडा शिकवेल!

  • Written By: Last Updated:

पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) मतदार संघ ही पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ असून ते योग्यच निर्णय घेतील. व्यापारी वर्ग हा देशाचा जाणकार वर्ग आहे. त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी कळते. मात्र अर्थव्यवस्थेबाबत (Economy) काहीही विचार न करता नको ते निर्णय घेतले जात आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने घेण्यात येणारा कोणताही निर्णय अर्थव्यवस्थेला धक्का बसविणारा नको. भारताचा नकाशा पाहिल्यास ६० टक्क्यांपेक्षा अधिक राज्ये भाजपच्या (BJP) ताब्यात नाहीत. याचाच अर्थ असा आहे की लोकांची मानसिकता भाजपला निवडून देण्याची नाही. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या हातातील सत्ता काही लोकांना फोडून घेतली. अन्यथा इथेही भाजपचे सरकार आले नसते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर केला.

कसबा विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्राचार सभेनिमित्त व्यापारी बांधवाचा आयोजित मेळाव्यात शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, राज्यात उद्धव ठाकारे यांच्या हातातील सत्ता भाजपने काही लोकांनी फोडून घेतली आणि स्वत: ची सत्ता स्थापन केली. पंजाब, हरयाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश यासह देशात ६० टक्के ठिकाणी भाजपाला नागरिकांनी नाकारले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसविण्याचे निर्णय सध्या घेण्यात येत आहे. देशाच्या अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाविकास आघाडीला नागरिकांनी पाठबळ देण्याची गरज आहे. कसबा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ असून योग्यच निर्णय घेणार आहेत.

Tags

follow us