Download App

अजितदादा देणार शरद पवारांना मोठा धक्का.. अजित गव्हाणे करणार समर्थकांसह घरवापसी?

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित गव्हाणे आपल्या जुन्या पक्षात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

विष्णू सानप, पुणे

Pune News : आमदारकीची निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा (Pune News) असल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून (Ajit Pawar NCP) शरद पवारांचे राष्ट्रवादीमध्ये गेलेले पिंपरी-चिंचवडमधील भोसरी राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी परतण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) गव्हाणे यांनी आपले समर्थक 25 माजी नगरसेवकांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आता आगामी महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) तोंडावर पुन्हा एकदा गव्हाणे आपल्या जुन्या पक्षात अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे गव्हाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निश्चित धक्का देणार,असं मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी गव्हाणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशाही चर्चा रंगल्या होत्या. गव्हाणेंना महामंडळाची ऑफर देखील शिंदे यांच्याकडून होती मात्र गव्हाणेंकडून त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने या चर्चाच राहिल्या अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीपूर्वी अजित पवारांची त्यांनी भेट घेतल्याने गव्हाणे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?

अजित गव्हाणे लेट्सअप’शी बोलताना म्हणाले, “होय मी अजित पवारांची भेट घेतली आहे. मात्र ही भेट राजकीय नव्हती. शहरातील विकासकामे आणि समस्यांबाबत मी त्यांची भेट घेतली आहे. मात्र भेटीदरम्यान अजितदादांनी तुम्ही परत पक्षात यावं अशी ऑफर देखील दिली आहे. मात्र आमचा अजून काहीही निर्णय झालेला नाही”

दरम्यान, पिंपरी चिंचवड हे शहर अजितदादांच्या सर्वात आवडीचे शहर असं म्हटलं जातं. या शहराच्या विकासकामांमध्ये अजित पवारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या शहरावर त्यांचं विशेष लक्ष असतं. सुरू असलेल्या घडामोडी पाहता अजित गव्हाणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच थांबतील असं वाटत नाही ते लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

लोकसभेपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्यासाठी जणू स्पर्धाच लागली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केल्यानंतर चित्र पालटलं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले. काहींची राजकीय तडजोड तर काहींची महत्वकांक्षा होती त्यापैकीच गव्हाणे सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गेले होते. मात्र यश मिळालं नाही. त्यामुळे पुन्हा महापालिकेच्या तोंडावर गव्हाणे आपल्या समर्थकांच्या राजकीय भवितव्यासाठी आणि ज्या नेत्यांसोबत अनेक वर्ष काम केलं त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, चालू घडामोडी पाहता शरद पवार देखील पिंपरी चिंचवडवर लक्ष ठेवून आहेत. ते देखील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 17 जूनला शहरात आढावा घेणार आहेत. तोपर्यंत गव्हाणे शरद पवारांसोबत राहतात की त्यापूर्वीच धक्का देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

CM फडणवीस अन् राज ठाकरेंची गु्प्त बैठक, रोहित पवारांना मात्र वेगळीच भीती; म्हणाले, “राज ठाकरेंचं..”

follow us