Download App

बेनकेंनी दिवसभर कष्ट घेतले, पाहुणचार केला; पण पवारांनी जुन्नरच्या उमेदवाराचे नाव नाही सांगितले!

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar : राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बनके (Atul Benke) कोणत्या गटाचे आहेत, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण तयार झाला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जुन्नर तालुक्यातील राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण आहे. जुन्नरमधून कोण उमेदवार असणार? या प्रश्नांचे उत्तर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) दिले. जुन्नरचा उमेदवार हा मी ज्या राष्ट्रवादीचा आहे, त्या पक्षाचा असेल. या जागेच्या उमेदवारांबाबत मी निर्णय घेणार आहे, असं ते म्हणाले.

आज शरद पवार हे जुन्नरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तत्पूर्वी शरद पवार आणि आमदार अतुल बेनके यांनी एकत्र जेवण केलं. मात्र, बेनके यांचा कल अजित पवार गटाकडे असल्याची चर्चा आहे. हाच मुद्दा पकडून पत्रकारांनी पवारांना जुन्नरच्या जागेविषयी विचारले. जुन्नरमधून शरद पवार गटाचा उमदेवार कोण? या प्रश्नाला उत्तर देतांना पवार म्हणाले की, निवडणुकीला अजून वेळ आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेबाबत अनेक वर्षापासून माझा असा अनुभव आहे की, ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाही.

आगामी निवडणूकीला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातीत शिवसेना, कॉंग्रेस आणि ज्या पक्षाचा मी संस्थापक आहे, तो पक्ष एकत्रित सामोरे जाणार आहेत. त्याच्यामध्ये आमचं जे सुत्र आहे, त्यानुसार जुन्नरची जागा ही ज्याचा मी अध्यक्ष आहे, त्या राष्ट्रवादीकडे राहिल, असं पवार म्हणाले.

आंबेगावला सभा होणार
दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार पहिली सभा आंबेगावात घेणार होते. मात्र त्यांनी येवल्यात सभा घेतली. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आंबेगावला सभा होईल, असं सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. याविषयी विचारले असता पवार म्हणाले की, मोदीजी पुण्यात येत आहेत, हे चांगली गोष्ट आहे. निदान रस्त्यांवरचे खड्डे तरी बुजले जातील, असा टोला लगावला.

वाघनखांबद्दल फारस माहित
छत्रपती शिवाजी महाजांनी वापरलेली वाघनखं लंडनच्या संग्रहालयातून आणल्या जाणार आहेत. ही वाघनखं तीन वर्षासाठी राज्यात असणार आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आदित्य ठाकरे, इंद्रजित सावंत यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली का? उगाच दिशाभूल करू नये, असं मत व्यक्त केलं. याविषयी पवारांना विचारले. ते म्हणाले, मला काही त्यातलं ज्ञान नाही. मात्र, इंद्रजित सावंत हे मराठी भाषेतील इतिहासाचे जाणकार आहे. त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबत वेगळं मत आहे. मात्र, मला वाघनखांबद्दल फारस माहित नाही. तसंच त्याबाबत वाद निर्माण करावा, असं मला वाटत नाही.

Tags

follow us