Download App

आरक्षण, घरगुती गॅस अन् सरकारी नोकऱ्या; शरद पवारांच्या जाहीरनाम्यात काय काय आश्वासनं ?

  • Written By: Last Updated:

पुणे : लोकसभा निडणुकीसाठी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) गटाकडून जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव देण्यात आले असून, यात अनेक घटकांतील लोकांना केंद्रस्थानी ठेवत अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. पवारांच्या जाहीरनाम्यात युवक, महिला-मुली , शेतकरी,कामगार,उपक्षीत नागरिक, ज्येष्ठ नागरिक, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, उद्योग, कर प्रणाली, नागरी विकास, पर्यावरण, पर्यटन, कला, सांस्कृतिक, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्यावर आश्वासन देण्यात आली आहेत. (Sharad Pawar Party Announced Manifest For Loksabha Election )

BJP Manifesto : रोजगाराची गॅरंटी अन् 3 कोटी घरे; भाजपाच्या;मोदी की गॅरंटी; जाहीरनाम्यात काय काय?

पवारांच्या जाहीरनाम्यात काय काय? 

राष्ट्रासाठी राष्ट्रवादी: NCP चा जाहीरनामा प्रसिध्द, पक्षाने कुठली आश्वासनं दिली?

गॅस सिलिंडरच्या किंमती 500 च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करू

सरकारी नोकऱ्या रिक्त जागा भरण्याचं काम करू
8500 रुपये स्टायपेंड पहिल्या वर्षी दर महिन्याला देऊ
स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ केलं जाईल
महिला व मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करू
शाळा महाविद्यालयात सेफ्टी ऑडीट केलं जाईल
शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार त्यात केंद्राचा राजकीय हस्तक्षेप कमी करू
शासकीय क्षेत्रात कंत्राटी भरती बंद करू
जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू यानंतर आरक्षणातील 50 टक्क्यांची अट दूर करण्याचं काम करू
खासगी शैक्षणिक संस्थात महिलांना आरक्षण देणार
रेशनकार्ड पात्रतेच्या निकषात सुधारणा करणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय पातळीवर आयोग सुरू करू
आरोग्यासाठी 2028-29 पर्यंत तरतूद 4 टक्क्यांपर्यंत वाढवू तसेच राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार.
स्वतंत्र जीएसटी समिती स्थापन करणार. शैक्षणिक आणि शेतीविषयक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही.
कामगारांचं किमान वेतन प्रतिदिन 400 रुपये असेल यासाठी प्रयत्न करू

follow us