‘मोदींच्या रूपाने पुतीन तयार होतोय’; शरद पवार यांची कडवी टीका

‘मोदींच्या रूपाने पुतीन तयार होतोय’; शरद पवार यांची कडवी टीका

Sharad Pawar On Pm Narendra Modi : मोदींच्या रुपाने देशात पुतीन तयार होतोयं, अशी कडवी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असतानाच आज महाविकास आघाडीची अमरावतीत सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी भाजपसह मोदींवर टीकास्त्र सोडले आहे.

‘खडकवासला’ कोणाला पाजणार पाणी? भाजपच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मुक्काम, सुळेंचीही फिल्डिंग

शरद पवार म्हणाले, आम्ही अलीकडच्या काळामध्ये रशियाच्या एका राज्यकर्त्याचं वर्णन वाचतो. तो राज्यकर्ता म्हणजे Me & Entire पूर्ण रशिया. रशियाचं प्रशासन, रशियाची शासन यंत्रणा आणि त्या व्यक्तीचं नाव पुतीन. आज या देशात मोदींच्या रुपानं नवीन पुतीन तयार होतोय का काय? ही चिंता या देशाच्या जनतेला आहे, देशाची संसदीय लोकशाही संकटात जाईल असंच चित्र असल्याची कडवी टीका शरद पवार यांनी केली आहे.

तसेच १० वर्षात मी काय केलं हे सांगण्याऐवजी आम्हा लोकांना विचारतात तुम्ही गेल्या १० वर्षात काय केलं. अरे २०१४ ते २०२४ तुम्ही आहात, तुमच्या हातात सत्ता आहे त्या सत्तेचा वापर कसा केला आणि देशाचं चित्र बदलायला तुम्ही काय केलं हे सांगण्याऐवजी अन्य लोकांच्या टीका टिपण्णी करायची, हे सूत्र ज्या व्यक्तीच्या मनात आहे त्याचा अर्थ स्पष्ट हा आहे की, व्यापक दृष्टिकोन राज्यकर्त्यांचा असला पाहिजे, त्या दृष्टिकोनाचा अभाव आजच्या नेतृत्वामध्ये आहे आणि म्हणून अशांच्या हातातून सत्ता काढून घेण्याचं काम हे करायला लागले अशी टीका शरद पवारांनी केलीयं.

पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक…

नेहरुंचा इतिहास कोणीही पुसू शकत नाही…
हिंदुस्थानच्या पार्लमेंटमध्ये अशी कोणती व्यक्ती नाही की जो एके दिवसाच गॅप न घेता ५६ वर्ष सतत निवडून येतो. या ५६ वर्षांमध्ये अनेकांना जवळून पाहिलं, लांबून पहिलं. इंदिरा गांधींना पाहिलं, राजीव गांधी आणि आम्ही एकत्र संसदेत होतो त्यांचं कामकाज पाहिलं. नंतरच्या काळामध्ये नरसिंहरावांचं काम पाहिलं. त्यांच्या मंत्रीमंडळामध्ये काम केलं. मनमोहन सिंहांच्या वेळेस काम केलं. अलीकडच्या काळात जे जे प्रधानमंत्री झाले, जवाहरलाल नेहरूंच्या नंतरचे त्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या कामाची पद्धत ही आम्ही लोकांनी पाहिली. देशाच्या कानाकोपऱ्यात जायचे, भाषणं करायचे आणि त्या भाषणातून नवा भारत कसा उभा करता येईल.

या प्रकारचा लोकांचा आत्मविश्वास वाढेल, अशा प्रकारचा संदेश या सगळ्या राज्यकर्त्यांनी दिला. आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंवर टीका करतात, काँग्रेस पक्षावर टीका करतात. ज्या जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यांच्या पूर्वकाळामध्ये आमच्या आयुष्याची उमेदीची काळ जवळपास १० ते ११ वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश संसदीय लोकशाहीच्या पद्धतीने चालला पाहिजे यासाठी एक रचना उभी केली. त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हे या देशाच्या इतिहासात कुणीही पुसू शकत नाही आणि तेच आजचे प्रधानमंत्री हे त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube