Download App

Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का?

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापाठोपाठ माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा टोला त्यांनी माजी राज्यपाल कोश्यारी आणि फडणवीस यांना लागवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधी हा शरद पवार यांना विचारूनच झाला होता, असा दावा केला आहे. भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन गेल्यावर त्यांनी एका मुलाखतीत सांगितेले की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांचा आग्रह होता.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी महिला कार्यकर्त्याची भीष्म प्रतिज्ञा

या प्रकरणावर बोलताना शरद पवार म्हणाले, पहाटे सरकार बनवायचा प्रयत्न केला होता. त्याचा फायदा एकच झाला की राज्यातील राष्ट्रपती राजवट उठली. ती उठल्यानंतर काय झालं ते आपण पाहिलेचं आहे.

पुढं बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांना बोलायची काय गरज आहे? मी सरळ सांगितले आहे. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का? समझने वालों को इशारा काफी है, असा मिश्किल टोला लागवला आहे.

देवेंद्र फडणवीस गौप्यस्फोट काय होता?
2019 साली सत्तास्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता. त्यावेळी आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. सरकार बनवण्याच्या सर्व वाटाघाटी झाल्या होत्या. कोणते खाते भाजपला द्यायचे कोणते खाते राष्ट्रवादीला द्यायचे हे ठरलं होतं. हे फक्त अजित पवार यांच्यासोबत ठरलं नव्हतं तर ते शरद पवार यांच्याशी बोलून ठरलं होतं. राष्ट्रपती राजवट लागली होती त्यावेळी राष्ट्रवादीने राज्यपालांना एक चिठ्ठी दिली होती ती चिठ्ठी देखील मीच लिहून दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबद एका मुलाखतीत केला होता.

कोश्यारींचा दावा काय होता?
आमच्याकडे एक मोठ्या पक्षाचा नेता येतो आणि त्याच्यासोबत मित्रपक्षाचा नेता येतो. ते म्हणतात की, माझ्याकडे पाठिंब्याच्या स्वाक्षऱ्या आहेत. नेते विश्वसनीय आहेत. छोटे पण नाहीत. अजित पवार छोटे नेते नाहीत. ते मला येऊन भेटले. मी म्हणालो ठिक आहे. तुमचं बहुमत आहे. सिद्ध करा. मी सिद्ध करण्यासाठी वेळ दिला. असं झालं असेल की वेळ जास्त दिला. कोर्टाने सांगितलं वेळ कमी करा. कमी केला. बहुमत सिद्ध करण्यास समर्थ नव्हते मग त्यांनी राजीनामा दिला.

Tags

follow us