उद्धव ठाकरे यांच्यासाठी महिला कार्यकर्त्याची भीष्म प्रतिज्ञा
कल्याण : राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना पक्ष (Political Party)आणि चिन्ह ही गमवावं लागलं आहे. आपल्या नेत्याला अडचणीत पाहून कल्याणमधील (Kalyan)एका महिला कार्यकर्त्यानं देवींच्या चरणी अनोखी अशी प्रतिज्ञा केलीय. जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या आशा रसाळ (Asha Rasal)यांनी केली आहे.
मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवींच्या चरणी साकडं घालून आशा रसाळ यांनी शपथ घेतली की, जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय संकट संपत नाही, तसेच उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत नाही, तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही.
Jitendra Awhad : दाऊदची माणसे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये चहा पितात
ठाकरे गटाच्या अडचणीत सातत्यानं वाढ होताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटानं बंडखोरी करुन भाजपासोबत जावून नवीन सरकार स्थापन केलं. आता इलेक्शन कमिशननं शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिलं आहे. त्यानंतर सर्वच स्तरांतून चर्चांना उधाण आलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार टीका देखील केली जातेय.