Download App

कोणी सोडून गेलं म्हणून चिंता करण्याचे कारण नाही, संघटना स्वच्छ झाली, पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

Sharad Pawar on Ajit Pawar : तुमचा कार्यक्रम काय होता, तुम्ही कुणाचं नेतृत्व स्वीकारलं होतं आणि आता कुणासोबत गेला आहात, असे प्रश्न लोक विचारणार म्हणून आमच्यावर हल्ला करत आहेत.त्यामुळे फारसा विचार करण्याची गरज नाही, आम्ही विचारांशी बांधिल आहोत, संधीसाधू नाही, अशा शब्दत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला.

कोणी गेलं म्हणून चिंता करण्याचे कारण नाही. शेवटी सामान्य लोकांमध्ये जाऊन भूमिका मांडण्यात जे यशस्वी झाले अशाच लोकांसोबत युवक राहत असतात. ती अवस्था या महाराष्ट्रात नक्की बघायला मिळेल. माझ्या मते जे काही घडलं त्याच्याबद्दल चिंता करण्याचे कारण नाही. त्यामुळे संघटना स्वच्छ व्हायला लागली. नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती तयार झाली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्यांकडून पुन्हा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकांकडे गेल्यानंतर प्रश्न विचारतील म्हणून आपल्यावर हल्ले करा आणि मुळ मुद्द्यांवर दुर्लक्ष करा, असा प्रकार सुरु आहे. अजित पवारांनी कर्जत येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Lok Sabha : बारामतीसाठी अजितदादांपाठोपाठ भाजपनंही टाकला डाव; खास व्यक्तीसाठी लावणार ताकद

ते पुढं म्हणाले की एकदा आम्ही 60 लोक निवडून आलो होतो. त्यापैकी केवळ 6 लोक शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले. 60 वरुन 6 वर आलो होतो. त्यामुळे लोकांना वाटायचे की यांचा विचार संपला पण हा विचार गांधी, नेहरूंचा होता, फुले, शाहु, आंबेडकरांचा विचार होता. तो विचार कधी संपू शकत नाही. जनतेमध्ये आपण जाऊ शकतो. नवीन पिढी उभा केली तर वेगळं चित्र तयार होऊ शकते, असा विश्वास त्यावेळी आम्हाला होता. नंतरच्या काळात निवडणुका झाल्या आणि सोडून गेलेल्या पैकी 51 ते 52 लोक पराभूत झाले. याचा अर्थ हा आहे की लोकांना हा निर्णय आवडला नव्हता, असे शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us