Download App

शिवाजीराव आढळराव पाटील CM शिंदेंची साथ सोडणार; तब्बल 20 वर्षांनी ‘राष्ट्रवादीत’ करणार घरवापसी

पुणे : माजी खासदार, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची साथ सोडणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने येत्या दोन दिवसांत आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी 29 फेब्रुवारी रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, पक्ष अंगीकृत संघटना आणि सर्व शिवसैनिकांची अती तातडीची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत ते महत्त्वाची घोषणा करणार असून मोठा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Shiv Sena leader Shivajirao Adharao Patil will join the NCP in the next two days.)

शिरुरमध्ये शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil)  हे तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत गेल्यानंतर  शिरुर, सातारा, रायगड आणि बारामती या लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसच (NPC) लढवणार आहे, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अमोल कोल्हे यांनाही पराभूत करणार असल्याचे आव्हान दिले आहे.

अजितदादांकडून मोठ्या घोषणा! जाणून घ्या एका क्लिकवर अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये…

त्यामुळे राजकीय सोय म्हणून आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील आणि शिरूर लोकसभा लढवतील, असे बोलले जात आहे. नुकतीच पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिरुरवरील दावा सोडण्यासाठीच झाली असल्याचे बोलले जात आहे. पण असा कोणीही गैरसमजू करुन घेऊ नका. मी लोकसभा निवडणूक लढवणारच आणि महायुतीचा उमेदवार म्हणून लढवणार आहे यात तीळ मात्र शंका नाही, असे त्यांनी सांगितले होते. शिवाय अद्याप अजित पवार यांनीही शिरूरमधून लोकसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळेच आढळराव पाटील यांच्या भुमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

follow us