Download App

Shivajirao Aadhalrao Patil यांच्या राजकीय ताकदीला बूस्टर; पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड

  • Written By: Last Updated:

Shivajirao Adhalrao patil : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao patil ) यांची आज पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रीपदाचा दर्जा आहे. त्यामुळे ही नियुक्ती करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव यांना राजकीय बुस्टर दिल्याचे बोलले जात आहे.

Shivba Naav Marathi Song : शिवरायांची महती परदेशात नेणारं मराठमोळं गाणं ‘शिवबाचं गाणं’ प्रेक्षकांच्या भेटीला

तर पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आनंद व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांना आणि योग्य पद मिळणे गरजेचे असतात. हे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातलं होतं. त्यानुसार त्यांनीही नियुक्ती केली आहे या निवडीचा मला आनंद आहे. या पदाला योग्य तो न्याय द्यायचा मी प्रयत्न करेल.

चव्हाणांच्या राजीनाम्याचे नगरमध्ये पडसाद, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या व्यासपीठावर

गेल्या काही दिवसांपासून ही जागा रिक्त होती. त्यानंतर आता आढळराव यांची या जागेवर शासनाचे उपसचिव अजित कवडे यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या कार्यकाळात पदासाठी इच्छूक असलेल्या आढळरावांना अखेर नियुक्ती मिळाली आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हालचाली सुरू झाल्यात. उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. आढळराव पाटील हेही शिवसेनेकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून इच्छूक आहे.

follow us

वेब स्टोरीज