आढळराव शरद पवारांचे दार ठोठावतायत पण मी असताना…; कोल्हेंचा मोठा दावा

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 08T162609.013

 Amol Kolhe On Shivajirao Aadhalrao Patil : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दार ठोठावत आहेत, पण त्या दरवाजाची किल्ली माझ्याकडे आहे असा दावा कोल्हे यांनी केला आहे. यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर काही आरोप केले होते. या संदर्भात बोलताना अमोल कोल्हे यांनी हा दावा केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी आढळराव यांना चार वेळा मिळाली. मात्र, उद्धव ठाकरे संकटात असताना ते त्यांना सोडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतरही मी शरद पवारांच्या बरोबर आहे, असे कोल्हे म्हणाले.

मर्जीतील अधिकाऱ्यांना दूर सारलं अन् फडणवीसांनी पवारांना केलं जवळ : दोन्ही उपमुख्यमंत्री आता शेजारी!

तसेच राजकीय स्थितीबाबत आढळराव हे माध्यमांसमोर वेगळे आणि पाठीमागे वेगळे बोलतात. त्यातूनच शरद पवार यांची भेट घेण्यासाठी ते पाठीमागील दरवाजा ठोठावत आहे. मात्र, जो दरवाजा ते ठोठावत आहे त्याची चावी माझ्याकडे आहे. आढळराव यांच्या वयाचा सन्मान ठेवून मी त्यांचे स्वागत करेल. आढळराव यांच्या या भूमिकेमुळे 2014 साली मी त्यांचा प्रचार केल्याची खंत देखील आहे, असे कोल्हे यांनी सांगितले.

दरम्यान, काल देखील कोल्हे यांनी एक व्हीडिओ पोस्ट करत आढळराव पाटलांवर निशाणा साधला होता. मी माझे छंद उजळमाथ्याने सांगू शकतो, तशी आपल्या छंदाची परिस्थिती आहे का, असे म्हणत अमोल कोल्हेनी आढळरावांचे छंद काढण्याची धमकी दिली. मी कधी वयक्तिक टीकेला उत्तर देत नाही. परंतु जेव्हा सातत्याने गैरसमज निर्माण व्हावा या हेतूने पातळी सोडून वयक्तिक टीका केली जाते तेव्हा त्याला उत्तर देणे गरजेचे असते. असे अमोल कोल्हे म्हणाले होते.

जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतील अडसर? पवारांनी स्पष्टच सांगितलं

काय म्हणाले होते आढळराव पाटील 

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. आढळराव म्हणाले होते, “डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेची सरळसरळ फसवणूक केली. शिरूरमधील जनतेशी त्यांनी प्रतारणा केलेली आहे. एका गावात मी काम केले असे त्यांनी ठामपणे सांगावे. बोलताना ते अभिनयाच्या जोरावर नाटकी आवाजात सांगतात मी दिलेले शब्द पूर्ण केले, मात्र तसे काहीही झालेले नाही. तसे त्यांनी एकही काम दाखवावे. त्यांनी मालिका, सिनेमे, नाटके खूप केली. मात्र मतदारसंघात त्यांनी गेल्या चार वर्षांत काय काम केले, असा प्रश्न मी मतदारसंघातील एक सामान्य नागरिक म्हणून विचारत आहे.”

 

Tags

follow us