जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतील अडसर? पवारांनी स्पष्टच सांगितलं

जयंत पाटील अन् जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतील अडसर? पवारांनी स्पष्टच सांगितलं

Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या (NCP)बऱ्या, वाईट काळामध्ये जयंत पाटील (Jayant patil)आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra awhad)यांनी भक्कमपणाने स्वतःच्या करिअरचा किंचितही विचार केला नाही. पक्ष, विचारधारा, कार्यक्रम याच्यासाठी पाहिजे ते देण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे मला त्यांचा अभिमान असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.(Nashik Sharad pawar speak on Jayant patil Jitendra awhad ncp ajit pawar chagan bhujbal)

अजित पवारांचं बंड सत्तेसाठी पण शरद पवार कुणालाही माफ करत नाही; शालिनीताई पाटलांचा इशारा

आज शरद पवार यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. त्यांची पहिलीच सभा नाशिक जिल्ह्यातील मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या बालेकिल्ल्यात येवल्यात आहे. येवल्यामध्ये आल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी पवारांनी पुन्हा अजित पवार आणि छगन भुजबळ यांना डिवचलं आहे.

अजित पवारांनी कोणाचा पोपट मारला हे सिध्द; उदय सामंतांचा ठाकरे गटाला टोला

पवारांना पत्रकारांनी विचारले की, जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे पक्षातील अडसर ठरत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीत बंड केलेल्या नेत्यांकडून केला जात आहे. त्यावर पवारांनी सांगितले की, तुम्ही ज्या नेत्यांची नावं घेतली त्यांनी पक्षाच्या चांगल्या वाईट काळामध्ये पक्षासाठी काम केले आहे. त्यांनी कधीही आपल्या करिअरचा विचार केला नाही.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी कायम राष्ट्रवादी पक्षासाठी, विचारधारेसाठी, पक्षाच्या कार्यक्रमासाठी कायम काम केले आहे, त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा मला अभिमान असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील आणि जितेंद्र हे दोघेही शरद पवार यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे अजित पवार गटाकडून या दोन नेत्यांवर जोरदार निशाणा साधला जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर नुकतेच जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांच्या या दौऱ्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. आमच्यामुळे जर तुम्ही बाहेर गेला असाल तर मी राजकारण सोडून देतो पण तुम्ही परत या असे आवाहन त्यांनी अजित पवार गटाला केला आहे. अजित पवार यांच्या गटाकडून जितेंद्र आव्हाडांवर जोरदार निशाणा साधला जात आहे. आमचे भांडण विठ्ठलाशी नसून त्याच्या आजूबाजूच्या दोन-तीन भडव्यांशी आहे असे म्हणत जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube