Sushma Andhare Crtiticized Devendra Fadnavis : महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला नेणारे फडणवीस जेव्हा अनिल देशमुख सातत्याने पत्रकार परिषदा घेत होते बरोबर त्याच वेळेत सचिन वाझे लेटर बॉम्ब टाकतो. कसं काय.. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुखांवर कारवाई झाली. पण या काळात माध्यमांशी बोलण्याचा त्यांना अधिकार नव्हता. मग हा स्कोप सचिन वाझेला कसा मिळू शकतो? इतके दिवस सचिन वाझे काय झोपी गेला होता का? सचिन वाझे म्हणतो मी फडणवीसांना पत्र लिहिलं पण फडणवीसांना पत्र लिहिण्याचा प्रश्नच कुठं येतो. त्यामुळे फडणवीसच स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? कुणाला वेड्यात काढताय? अशा शब्दांत ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
‘देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’ सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी सचिन वाझेच्या पत्राच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. यावेळी खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार भास्कर जाधव आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंधारे पुढे म्हणाल्या, इतके दिवस सचिन वाझे काय झोपी गेला होता का? सचिन वाझे म्हणतो मी फडणवीसांना पत्र लिहिलं पण फडणवीसांना पत्र लिहिण्याचा प्रश्नच कुठं येतो. त्यामुळे फडणवीसच स्वतः संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सीबीआयला पत्र लिहिलं असतं तर आम्ही समजू शकलो असतो पण फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का? कुणाला वेड्यात काढताय? असा सवाल अंधारे यांनी यावेळी उपस्थित केला.
‘अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे’ सचिन वाझेंचा आरोप; फडणवीसांना पत्र
आम्हाला कायदा तडीपार गुंडांनी शिकवू नये, ज्यांच्या शर्टवर जस्टिस लोया यांच्या रक्ताचे डाग आहेत, त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये. तडीपार फॅन क्लबचे अध्यक्ष अमित शाह आहेत अशा कठोर शब्दांत सुषमा अंधारे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष असा केला होता. त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी आजच्या मेळाव्यात उत्तर दिले.