Shrimant Bhausaheb Rangari Ganpati: पुण्यातील मानाचा आणि हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अशी ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता करत निरोप देण्यात आला. दुपारी 4 वाजून 1 मिनिटांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
विविध श्रेत्रातील मान्यवरांकडून’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ चं सहकुटुंब दर्शन घेत आरती
पोलिसांनी दिलेल्या वेळेचं पालन करत गणपती विसर्जन वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचं उत्सवप्रमुख व मंडळाचे विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी सांगितलं. बाप्पाला निरोप देताना मनाला दुःख होतं, मात्र पुढच्या वर्षी पुन्हा बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
पुनीत बालन म्हणाले की, गणपती बाप्पा जाता जाता सर्वांना आशीर्वाद देऊन गेले आहेत. आता पुढील वर्षाच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी आणखी चांगलं डेकोरेशन आणि भव्य स्वरूपात गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
धार्मिक उपक्रमांसह सामाजिक बांधिलकीही; श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा शिबिराचा उपक्रम…
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या विसर्जनावेळी मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना भक्तांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष केला.
