Download App

सिंकदर शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षेला चीतपट करत पटकावले जेतेपद

  • Written By: Last Updated:

Maharashtra Kesari 2023 : पैलवान सिंकदर शेखने (Sinkdar Shaikh) शिवराज राक्षेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) किताब पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम सामन्यात सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात हायहोल्टेज सामना झाला. दोन्ही पैलवांनीना महाराष्ट्र केसरीची गदा पटकवाण्यसाठी शड्डू ठोकला होता. मात्र, सिंकदर शेखने शिवराज राक्षेला चीतपट करत केसरीच्या गदेवर आपली मोहोर उमटवली आहे.

Video : ‘मी मुख्यमंत्र्यांचंही ऐकत नसतो, सांगेल ते करायचे’; सत्ताधारी मंत्र्यांचा भलताच कॉन्फिडन्स 

यंदाची ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा फुलगाव, पुणे येथे पार पडली. महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या अंतिम सामन्यात गंगावेस तालमीत कुस्तीचे धडे गिरवणारा सिकंदर शेख आणि गतविजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांच्यात फायनल झाली. शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाच्या महाराष्ट्र केसरीची गदा पटकावणार याकडं राज्याचं लक्ष लागलं होतं. शिवराजने यंदा डबल महाराष्ट्र केसरीसाठी जोर लावला होता. तर सिकंदरकडे गतवर्षी हुकलेली गदा पटकावण्याची नामी संधी आली होती.

दीपिका ते आदिती धनत्रयोदशीचे ग्लॅमर लूक 

उपांत्य फेरीत गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्याचे त्यांचे ध्येय होते. मात्र, त्याचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. अखेर सिंकदरने शिवराज राक्षेचा पराभव करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. सिंकदरने शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदात चीत केलं आणि महाराष्ट्र केसरीचा बनण्याचा मान मिळवला.

अंतिम सामन्यात सिंकदरचे पारडे जड झाले होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिंकदरपुढे त्याचा निभाव लागला नाही. लढतील सुरवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिंकदरने झोळी डाव टाकत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चिटपट केले.

सिकंदर हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असून त्याच्या घरात आजोबांपासून कुस्तीचा वारसा आहे. त्याचे वडीलही कुस्ती खेळायचे. मात्र गरिबीमुळे त्यांना कुली म्हणून काम करावे लागले. सिकंदर अलीकडेच भारतीय लष्करात दाखल झाला आहे. तो सैन्यदलाकडूनही खेळतो. आपला मुलगा मोठा मल्ल व्हावा ही वडिलांची इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. आत्तापर्यंत सिकंदरने देशभरात अनेक कुस्त्या खेळून अनेक पारितोषिके जिंकली आहेत. सिकंदरने एक महिंद्रा थार चारचाकी, एक जॉन डीअर ट्रॅक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टीव्हीएस, सहा स्प्लेंडर्स आणि चाळीस चांदीच्या गदा जिंकल्या आहेत.

 

 

follow us