‘ती’ धमकी नाही, पैलवानांना विचारण्याचा हक्क, सिकंदर शेखने दिलं स्पष्टीकरण

‘ती’ धमकी नाही, पैलवानांना विचारण्याचा हक्क, सिकंदर शेखने दिलं स्पष्टीकरण

पुणे : पोलिस नाईकाकडून ती धमकी नसून जाब विचारण्यात आल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सेमीफायनमध्ये पराभूत झालेला पैलवान सिकंदर शेख याने दिलंय. कुस्तीत जे गुण पंचांनी दोन्ही मल्लांना दिले आहेत, ते चुकीचं असल्याचा आरोपही सिकंदरने यावेळी केला आहे.

महाराष्ट्र केसरीच्या सेमीफायनल सामन्यात महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेखमध्ये कुस्ती झाली. यावेळी महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला. मात्र महेंद्रला जे पॉंइट मिळाले त्यावर सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यावर आता स्वत: सिकंदर शेखने आपली कैफियत मांडलीय.

सिकंदर म्हणाला, सोशल मीडीयावर जे तुम्ही सर्वांनी पाहिलंय ते खरं आहे. जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. जिथं दोन पॉइंट दिले पाहिजे होते तिथे पंचांकडून चार पॉइंट देण्यात आले आहेत. चार पॉइंट देण्याचा काहीच प्रश्न येत नाही. त्यावेळी पंचांनी मला पुढचा कॅमेरा दाखवला, त्यांनी मागील बाजूचा कॅमेरा दाखवला नसल्याचा आरोपही केला आहे. तसेच आमचा कोच त्या ठिकाणी आला तर त्यांना हाकलून दिल्याचंही सिकंदरने सांगितलंय.

जे काही घडलंय ते चुकीचं असून त्या प्रकरणी माझ्यावर प्रेम करणारे लोकं जाब विचारत आहेत. त्यावेळी पंचांनी माझे चार आणि प्रतिस्पर्धी मल्लाचे दोन पॉइंट दिल्याचं सिंकदरकडून सांगण्यात येतंय. या संपूर्ण प्रकरणावर पंचांना एका पोलिस शिपायाकडून जाब विचारण्यात आला आहे. ही धमकी नसून जाब विचारला आहे. पोलिस नाईक आणि पंचांसोबत बोलणं झाल्याची कॉल रेकॉर्डींग मी ऐकली असून ती धमकी नाही. तसेच मी आत्तापर्यंत थकलेलो नाही अन् यापुढेही मी थांबणार नाही, असं पैलवान सिंकदर शेख यांनी सांगितलंय.

रेकॉर्डिंगमध्ये कोणत्याही प्रकारची शिवी नसून माझ्यावर प्रेम करणारी लोकं त्यांना असं का केलं विचारत आहेत. दरम्यान, त्यांनी जर विचारलं नाहीतर यापुढील काळातही असंच घडत राहणार असल्याचंही सिकंदरने स्पष्ट केलंय. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेख प्रबळ दावेदार मानला जात होता, पण महेंद्रला जास्त पॉईंट मिळाल्यामुळे सिकंदरचा पराभव झाला. सेमी फायनलमध्ये महेंद्रकडून पराभूत झालेल्या सिकंदर शेखची सध्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube