बिबट्याच्या दहशतीने सामाजिक संकट; बिबट्याच्या हल्ल्यांच्या भीतीने पुणे जिल्ह्यात लग्नासाठी मुली मिळेना

leopard attacks मुळे पुणे जिल्ह्यात मुलांच्या लग्नासाठी मुली न देण्याचं नवीनच मुलींच्या पालकांकडून पुढे केलं जात आहे.

Leopard Attacks

Leopard Attacks

Social crisis due to leopard terror; Girls not available for marriage in Pune district due to fear of leopard attacks : मुला-मुलींचे विवाह निश्चित करणे हे सध्याच्या काळात एक मोठं आव्हान ठरत आहे. यासाठी अनेक कारण आहेत. जसे की, मुला मुलींची पसंती, आपेक्षा, आर्थिक सामाजित स्थिती. पण पुणे जिल्ह्यात मुलांच्या लग्नासाठी मुली न देण्याचं नवीनच मुलींच्या पालकांकडून पुढे केलं जात आहे. हे कारण दुसरं तिसरं काही नसून पुणे जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेला बिबट्या या हिंस्त्र प्राण्याचा वावर आणि नुकतेच झालेले काही बिबट्यांचे हल्ले. त्यामुळे आता बिबट्याच्या दहशतीने सामाजिक संकट निर्माण झालं आहे.

नेमकं प्रकरणं काय?

गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत पाहायला मिळत आहे. यामध्ये गेल्या दीड महिन्यांत बिबट्यांच्या (leopard) हल्ल्यांमध्ये चार निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शिरूर तालुक्यातील पिंपरखेळ येथे 5 वर्षांच्या शिवन्या बोंबे, शिरूरमधीलच मौजे जांबूत, येथे 70 वर्षीय श्रीमती भागाबाई रंगनाथ जाधव, त्यानंतर 13 वर्षीय रोहन विलास बोंबे, या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. मात्र दुसरीकडे या बिबट्याच्या दहशतीने मुलींचे पालक या भागातील मुलांना लग्नासाठी मुली देण्यास नकार देत आहेत.

Delhi Blast : रूग्णसेवा ते दहशतवादी कट; डॉ. शाहीन नोकरी सोडून अशी बनली जैशची ‘रिक्रूटर’

त्यामुळे आता गेल्या काही दिवासांपासून शिरूर आणि बिबट्याचा वावर असलेल्या इतर अनेक भागामध्ये मुलांची लग्न जुळत नाहीत. अनेक मुलांच्या पालकांना स्पष्ट तुमच्या गावामध्ये बिबट्याचा वापर आणि दिवसाढवळ्या लोकांवर , जनावरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे आम्ही आमची मुलगी तुमच्या गावामध्ये देऊ शकत नाही, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे अनेक लग्नाळू आणि वेल सेटल्ड मुलांची लग्नाची स्वप्न अधांतरी राहू लागली आहेत.

Exit mobile version