Pune International Airport : लोहेगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Pune International Airport) जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, त्यासाठी राज्य सरकारने (State Govt) प्रस्ताव तयार करून केंद्रकडे पाठवावा, अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी केली होती. दरम्यान, आता राज्य सरकारने लोहगाव विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली.
Navra Majha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ ची ट्रेन सुसाट, विकेंडला कमावले ‘इतके’ कोटी
धन्यवाद, महायुती सरकार !
धन्यवाद, मा. देवेंद्रजी !पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा… pic.twitter.com/vbtenDNYiD
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 23, 2024
याबाबत मोहोळ यांनी ट्वीटवर एका पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलं की, पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे असं करण्यात येणार असून त्या दृष्टीने आज पहिले पाऊल टाकलं
आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
मुरलीधर मोहोळ यांची पोस्ट काय?
धन्यवाद, महायुती सरकार
धन्यवाद देवेंद्रजी…!
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले असून, आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मान्यता मंजूर करण्यात आला असून पुढील प्रक्रियेसाठी तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्ये मंजूर केला जाईल, या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. देवेंद्रजींनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला.
Vidhansabha : ‘आपले आशीर्वाद असू द्या…’; प्रमोद भानगिरेंनी ठोकला हडपसरच्या जागेवर दावा
या संदर्भातील प्रस्तार सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून चर्चा केली होती. आपल्या प्रस्तावानंतर काहीच दिवसात हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला असून त्याबद्दल तिन्ही नेतृत्वाचे मनस्वी अभिनंदन आणि धन्यवाद !
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संत तुकाराम महाराज यांचं आजोळ होतं. इतकंच नाही तर तुकाराम महाराजांचे बालपण लोहगावमध्ये गेल्याने लोहगाव आणि तुकोबाराय यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे गावकरी, महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाच्या इच्छेसह हा प्रस्ताव आपण राज्य सरकारकडे दिला होता. शिवाय वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून भागवत धर्माच्या प्रचार, प्रसारात तुकोबारायांनी मोठं योगदान देत समाजाला नवा विचार दिला, जो आजही काल सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबारायांचं नाव पुण्याच्या आंतराष्ट्रीय विमामतळाला देणे, हे अतिशय संयुक्तिक असल्याची सर्वांचीच भावना आहे, असंही मोहोळ म्हणाले.
आता राज्य सरकारने मंजूर केलेला हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे जाणार असून यासंदर्भात केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल आणि यासाठी या विषयाचा पाठपुरावा करणार आहे. मला विश्वास आहे, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण होईल, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.