Successful organization of a health check-up camp : आषाढी वारीच्या निमित्ताने आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये निमा वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ. जबीन पठाण आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला.
यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर ऑफ फार्मसी (फार्म. डी.) विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी तपासणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. तसेच वारकऱ्यांना आवश्यक ओटीसी औषधांचे वाटप, औषधोपचाराबाबत समुपदेशन आणि वारीदरम्यान आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
यावेळी महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. साक्षी शिंदे आणि त्यांचे वडील ॲड. भाऊसाहेब शिंदे यांनी सर्व वारकऱ्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी भोजनाची व्यवस्था करून सेवाभावाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी या आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनासाठी “निमा” च्या डॉक्टरांचे आभार मानले. या उपक्रमाचे नियोजन डॉ. रामदास शिंदे, डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर, डॉ. निकिता पारगे, डॉ. ऋतुजा हिप्परकर, तसेच फार्म. डी. विद्यार्थी प्रतिनिधी यशराज जाधव यांनी केले.
