Download App

निवडणुकीच्या रणांगणातून सुनेत्रा पवार क्रिकेटच्या मैदानात; विजयी षटकार लगावताच कार्यकर्त्यांचा जल्लोष!

Sunetra Pawar कधी भावनिक कधी कणखर होत मतदारांना आवाहन करत आहेत. त्यात आता त्या थेट क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.

Sunetra Pawar played cricket during Lok Sabha Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा ( Lok Sabha Election ) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आणि उममुख्यमंत्रभी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. यामध्ये कधी भावनिक तर कधी कणखर होत. त्या मतदारांना मतदानाचे आवाहन करत आहेत. त्यात आता निवडणुकीच्या रणांगणातून सुनेत्रा पवार थेट क्रिकेटच्या मैदानात ( played cricket ) उतरल्याचं पाहायला मिळालं.

भाजपला खटकलं! आपल्या नेत्यांंचे फोटो अन् लंकेंचा प्रचार; थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार

पुण्यातील आंबेगावमध्ये प्रचार दौऱ्यावर असताना लेक विस्टा सोसायटीमध्ये रविवार असल्यामुळे सर्व नागरिक क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. त्याचवेळी सुनेत्रा वहिनी प्रचारासाठी तेथे पोहोचल्या. तेव्हा सर्व नागरिकांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्यांनी नागरिकांच्या आग्रहाला मान देत चक्क बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या व विजयाचे चौकार व षटकार लगावले. त्यांनी विजयी षटकार लगावताच कार्यकर्त्यांचा जल्लोष यावेळी पाहायाला मिळाला. तसेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

केरळचा ‘अमिताभ’, भाजपसाठी किंगमेकर? डाव्या पक्षांना धक्क्यासाठी रचलाय ‘त्रिशूर’चा व्यूह

या अगोदर सुनेत्रा पवार यांनी आज खडकवासला मतदारसंघातील वारजे, बावधन आणि कोथरुड भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेट देत नागरीकांशी संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, प्रत्येक भागात फिरताना काही ना काही समस्या आहेतच. या समस्यांचा मी आढावा घेवून त्या सोडवण्यावर माझा भर असणार आहेत. त्याचवेळी सर्वांना सोबत घेवून बारामती लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

सुनेत्रा पवार यांचा मतदारसंघात झंझावती प्रचार सुरू आहे. त्यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महायुतीची वज्रमूठ अधिक घट्ट झाली आहे.

follow us